कडक सॅल्युट ! भारतीय तरुण अमेरिकेत झाला जज, घर खर्चासाठी एकेकाळी विडीही बनवायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 04:06 PM2023-01-08T16:06:27+5:302023-01-08T16:06:35+5:30

यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले तर आपल्याला यश नक्कीच मिळते. काहीजण पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर आपले प्रयत्न सोडतात, पण यश मिळेपर्यंत प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश मिळते.

success story india son surendran k patel became a judge in america | कडक सॅल्युट ! भारतीय तरुण अमेरिकेत झाला जज, घर खर्चासाठी एकेकाळी विडीही बनवायचा

कडक सॅल्युट ! भारतीय तरुण अमेरिकेत झाला जज, घर खर्चासाठी एकेकाळी विडीही बनवायचा

Next

यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले तर आपल्याला यश नक्कीच मिळते. काहीजण पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाले नाही तर आपले प्रयत्न सोडतात, पण यश मिळेपर्यंत प्रयत्न केले तर नक्कीच आपल्याला यश मिळते, असेच एक प्रकरण समोर आले आहे. भारतीय तरुण जज झाला आहे. या तरुणाचे नाव सुरेंद्रन पटेल असं आहे. हा तरुण केरळमधील रहिवाशी आहे. या पदापर्यंत पोहोचण्यासाठी सुरेंद्रने मोठा प्रवास केला आहे.   

सुरेंद्रनची ही यशस्वी गोष्ट संघर्षपूर्ण आहे. सुरेंद्रन पटेलने १ जानेवारी रोजी अमेरिकेतील टेक्सासमधील फोर्ट बेंड काउंटी मध्ये २४० वे जिल्हा जज पदाची शपथ घेतली. 

सुरेंद्रन पटेल यांचा जन्म केरळ येथील कासरगोडमध्ये झाला, त्यांची परिस्थिती पहिल्यापासून हलाखीची. आई-वडील काम करुन मुलांना शिकवत. अशा परिस्थितीत सुरेंद्रन यांना शाळा-कॉलेजच्या शिक्षणादरम्यानच्या खर्चासाठी मजुरीही करावी लागली. पैसे कमावण्यासाठी ते एका बिडी कारखान्यात काम करत होते. सुरेंद्रनच्या बहिणीनेही बिडीमध्ये तंबाखू भरणे आणि नंतर पॅकिंग या कामात मदत केली. त्यामुळे या कुटुंबाला चांगले उत्पन्न मिळत होते.

Bharat Jodo Yatra: 'हे योग्य नाही...', राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत काँग्रेसचे दुसऱ्यांदा अमित शहांना पत्र

सुरेंद्रनला यांना दहावीतून शिक्षण सोडावे लागले होते. पण पुन्हा त्यांनी शाळेत प्रवेश घेतले, पुढ कायद्याच्या क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहू लागला. नोकरीमुळे अनेकवेळा तो कॉलेजमध्ये जाऊ शकला नाही, पण त्याच्या मित्रांनी त्याला मदत केली.

सुरेंद्रन कामामुळे कॉलेजला जात नसे, कमी उपस्थितीमुळे त्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखण्यात आले होते. त्यानंतर सुरेंद्रन यांनी आपल्या प्राध्यापकांना परीक्षेला बसण्याची परवानगी देण्याची विनंती केली. पुढ त्यांना परिक्षेला बसण्यासाठी परवानगी मिळाली. याच परिक्षेत सुरेंद्रन कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास जाला.

कॉलेज पूर्ण केल्यानंतर सुरेंद्रनला लॉ युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा होता, पण त्यावेळी पैशांची कमी असल्यामुळे अडचणी येत होत्या. त्यानंतर मित्रांकडून पैसे उधार घेऊन लॉ विद्यापीठात प्रवेश घेतला. 1995 मध्ये, सुरेंद्रन पटेल यांनी त्यांची कायद्याची पदवी पूर्ण केली आणि केरळमधील होसदुर्ग येथे सराव सुरू केला. नंतर दिल्लीत सुप्रीम कोर्टात काम सुरू केले.

पुढं अचानक सुरेंद्रन यांना अमेरिकेला जावे लागले.  सुरेंद्रन यांची पत्नी नर्स आहे. 2007 मध्ये अमेरिकेतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर सुरेंद्रन पत्नी आणि मुलांसह ह्यूस्टनला गेले. येथे त्यांनी अमेरिकेत कायद्याचा अभ्यास करण्यासाठी पुन्हा नव्याने अभ्यास केला आणि 2011 मध्ये पदवी प्राप्त केली.

सुरेंद्रन यांना 2017 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले

सुरेंद्रन यांना 2017 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले, ते 2022 मध्ये न्यायाधीश झाले. सुरेंद्रन के पटेल यांना 2017 मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. यानंतर त्यांनी 2020 मध्ये जिल्हा न्यायाधीश होण्याचा पहिला प्रयत्न केला, पण होऊ शकले नाही. त्यानंतर 2022 मध्ये पुन्हा जिल्हा न्यायाधीश होण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वी झाले.

Web Title: success story india son surendran k patel became a judge in america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.