कमाल! वयाच्या 14 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वेळा UPSC उत्तीर्ण, अमिताभ बच्चनही झाले फॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2023 10:38 AM2023-07-04T10:38:51+5:302023-07-04T10:40:34+5:30

IPS Ravi Mohan Saini : रवि मोहन सैनी यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांचे वडील नौदलात अधिकारी होते.

success story IPS Ravi Mohan Saini kaun banega crorepati questions amitabh bachcha -kbs host | कमाल! वयाच्या 14 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वेळा UPSC उत्तीर्ण, अमिताभ बच्चनही झाले फॅन

कमाल! वयाच्या 14 व्या वर्षी बनला करोडपती; 2 वेळा UPSC उत्तीर्ण, अमिताभ बच्चनही झाले फॅन

googlenewsNext

UPSC परीक्षेतील यशस्वी उमेदवारांच्या गोष्टी खूप रंजक आहेत. काहींनी संघर्षाच्या अनोख्या कथा लिहिल्या आहेत, काहीजण अनेक गोष्टींचा त्याग करून यशस्वी होतात, काही मुलांपासून दूर राहून तयारी करतात तर काही पूर्णवेळ नोकरी करून घवघवीत यश संपादन करतात. त्यांच्यापैकी बहुतेकांमध्ये एका गोष्टीच साम्य असते ते म्हणजे सर्वजण खूप हुशार असतात.

आयपीएस रवि मोहन सैनी यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. 'कौन बनेगा करोडपती' हा टीव्ही शो पाहणारा प्रेक्षक त्यांना ओळखतो. 2001 मध्ये त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' ज्युनियरमध्ये सहभाग घेऊन 1 कोटी रुपये जिंकले होते. मग देशाने त्यांच्या हुशारीचं भरभरून कौतुक केलं. सुपरस्टार अमिताभ बच्चन हे देखील त्यांचे चाहते झाले.

कौन बनेगा करोडपती ज्युनियर 

रवि मोहन सैनी त्यावेळी दहावीत होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तेव्हा त्यांचे वय फक्त 14 वर्षे होते. त्यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी कौन बनेगा करोडपतीमध्ये सहभागी व्हायचे होते. हॉट सीटवर बसून अमिताभ बच्चन यांच्या 15 कठीण प्रश्नांची उत्तरे देत ते कौन बनेगा करोडपती ज्युनियर झाले.

वडिलांकडून मिळाली प्रेरणा 

रवि मोहन सैनी यांना त्यांच्या वडिलांकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांचे वडील नौदलात अधिकारी होते. त्याांनी जयपूरच्या महात्मा गांधी मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळवली आहे. पण त्यांना फक्त डॉक्टर व्हायचे नव्हते. नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होण्याचे त्यांचे ध्येय होते. UPSC परीक्षेच्या तयारीसाठी त्यांनी कोणतेही प्रशिक्षण घेतले नाही.

रवि मोहन सैनी 2012 मध्ये UPSC मुख्य परीक्षा पास करू शकले नाही. त्यामुळे 2013 मध्ये त्यांची भारतीय टपाल विभागाच्या लेखा आणि वित्त सेवा विभागात सरकारी नोकरीसाठी निवड झाली. त्यानंतर 2014 मध्ये मेडिकल इंटर्नशिप दरम्यान त्यांनी पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. यावेळी तो ऑल इंडिया रँक 461 ने पास झाले. रवी हे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: success story IPS Ravi Mohan Saini kaun banega crorepati questions amitabh bachcha -kbs host

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.