नोकरी सोडून स्टार्टअप सुरू, आईचं निधन झालं; पार्टनर पैसे घेऊन पळाला, आता 5 कोटींची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 11:07 AM2023-01-27T11:07:54+5:302023-01-27T11:08:47+5:30
स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला.
शक्तीस्टेलर कंपनी यशस्वी करणाऱ्या अंकित रॉय यांची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. अंकित रॉय यांचा फक्त त्याच्या बिझनेस आयडियावर विश्वास होता. या विश्वासामुळे आज त्यांच्या कंपनीची वार्षिक उलाढाल 5 कोटी रुपयांची होत आहे. त्याची कहाणी खूप प्रेरणादायी आहे. ते मुंबईत कामाला होते. याच दरम्यान, आईच्या आजारपणामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी स्टार्टअप सुरू केल्यावर आईचं निधन झालं आणि अंकित डिप्रेशनमध्ये गेले.
स्टार्टअपसाठी त्यांचा एक पार्टनर होता. तो पैसे घेऊन पळून गेला आणि गुंतवणूकदाराने गुंतवणूक करण्यास नकार दिला. पण तरीही अंकित खचले नाहीत. पुढे मेहनतीने यशस्वी झाले. अंकित यांनी 2009 मध्ये भोपाळच्या राजीव गांधी टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. बी.टेक केल्यानंतर त्यांना नोकरी लागली आणि ते मुंबईला आले. पाच वर्षे मुंबईत काम केले. पण, नंतर त्याच्या आईला कॅन्सर झाला. आईच्या उपचारासाठी ते नोकरी सोडून भोपाळला आले.
स्टार्टअप सुरू करण्यासाठी अंकित यांच्याकडे जास्त पैसे नव्हते. तरीही, ते कामाला लागले. अंकित सांगतात की, पहिली ऑर्डर त्यांच्या वडिलांच्या मित्राकडून मिळाली. त्यांच्या घरी सोलर पॅनल बसवून 6,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले. अंकित यांच्या आईचे कर्करोगाने निधन झाले तेव्हाच त्याचे काम सुरू झाले होते. आईच्या निधनामुळे अंकित डिप्रेशनमध्ये गेले. पण नंतर 6 महिन्यांनी त्यातून बाहेर आली.
अंकित सांगतात की, त्यांनी पैसे उभे करण्यासाठी खूप संघर्ष केला. एका मित्राने त्यांची ओळख एका माणसाशी करून दिली. त्याने पैसे गुंतवण्याचे मान्य केले. यानंतर त्यांनी एका कंपनीसोबत 6 कोटींचा प्रकल्प करार केला. पण, अखेरच्या क्षणी गुंतवणूकदाराने पैसे गुंतवण्यास नकार दिला. या अडचणींमुळे अंकित खचले नाहीत आणि त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. आतापर्यंत त्यांनी 400 हून अधिक साइट्सवर सोलार पॅनेल बसवले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"