आई अन् मुलाला मिळाली सरकारी नोकरी, एकत्र केलेली परीक्षेची तयारी; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 05:45 PM2023-01-07T17:45:07+5:302023-01-07T17:47:38+5:30

42 वर्षीय बिंदू आणि तिचा 24 वर्षीय मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.

Success Story Mother Bindu and son Vivek got government job together | आई अन् मुलाला मिळाली सरकारी नोकरी, एकत्र केलेली परीक्षेची तयारी; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

आई अन् मुलाला मिळाली सरकारी नोकरी, एकत्र केलेली परीक्षेची तयारी; 'अशी' आहे सक्सेस स्टोरी

googlenewsNext

जिथे इच्छा असते तिथे मार्ग असतो असे म्हणतात. कठोर परिश्रमासमोर कोणतीही अडचण तुमच्या मार्गात अडथळा ठरत नाही. कष्टासमोर अडचणींना हार मानावी लागते. अशाच एका आई आणि मुलाची हृदयस्पर्शी गोष्ट आता समोर आली आहे. विशेष म्हणजे दोघांना एकत्र सरकारी नोकरी मिळाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मल्लपुरम येथे राहणारी 42 वर्षीय बिंदू आणि तिचा 24 वर्षीय मुलगा विवेक यांनी केरळ लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळेच आई आणि मुलाच्या या खास जोडीला एकत्र सरकारी नोकरी करण्याची संधी मिळाली. त्यांची यशोगाथा सर्वांना प्रेरित करते. 

बिंदू आणि विवेक यांनी मिळून या सरकारी नोकरीची तयारी सुरू केली. बिंदूने 'लास्ट ग्रेड सर्व्हंट' (एलडीएस) परीक्षा उत्तीर्ण केली आहे. यामध्ये तिला 92 वा क्रमांक मिळाला आहे. त्याचवेळी तिचा मुलगा विवेक हा देखील परीक्षेत उत्तीर्ण झाला आहे, ज्यामध्ये त्याला 38 वा क्रमांक मिळाला आहे. दोघांनीही एकाच कोचिंगमधून शिक्षण घेतले आहे. ते दोघे नक्कीच एकत्र शिकत होते पण ते एकत्र परीक्षा पास होतील याची त्यांना कल्पना नव्हती.

विवेक 10वीत असताना बिंदूने आधीच सरकारी नोकरीची तयारी सुरू केली होती. याच दरम्यान बिंदूनेही आपल्या मुलासोबत पुस्तके वाचण्यास सुरुवात केली. बिंदू या गेल्या 10 वर्षांपासून अंगणवाडी शिक्षिका आहेत. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी पती, शिक्षक, मित्र आणि मुलाचे सहकार्य मिळाल्याचे त्या सांगतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Success Story Mother Bindu and son Vivek got government job together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.