कौतुकास्पद! कधी भाजी विकली तर कधी रिक्षा चालवली; आज आहे करोडोंच्या कंपनीचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 10:58 AM2023-04-19T10:58:46+5:302023-04-19T11:05:05+5:30
'आर्य गो कॅब सर्व्हिस'चे मालक दिलखुश कुमार यांनी कठोर परिश्रमानंतर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली, त्याचबरोबर अनेकांना रोजगार दिला.
कोणालाही एका रात्रीत किंवा अचानक यश मिळत नाही, त्यामागे अहोरात्र मेहनत आणि समर्पण असते. जगात असे अनेक लोक आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आहे. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. कधी रस्त्यावर भाजी विकणाऱा तर कधी रिक्षा चालवणारा व्यक्ती कोट्यवधींच्या कंपनीचा मालक झाला आहे. 'आर्य गो कॅब सर्व्हिस'चे मालक दिलखुश कुमार यांनी कठोर परिश्रमानंतर समाजात स्वतःची ओळख निर्माण केली, त्याचबरोबर अनेकांना रोजगार दिला.
दिलखुश कुमार हे सुरुवातीला गाडी चालवली. त्यांचे वडीलही बिहारमध्ये बसचालक होते. पाटणा येथे शिपायाच्या नोकरीसाठी त्यांनी मुलाखत दिली होती, मात्र तिथे त्यांना रिजेक्ट करण्यात आले. यानंतर त्यांनी नोकरीसाठी दिल्ली गाठली. मात्र, येथेही ते अपयशी ठरले. कोणत्याही कार मालकाने त्यांना त्यांची कार चालवू दिली नाही. यानंतर त्यांनी रिक्षा चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
फटाक्यांच्या दुकानात काम केले
रिक्षा चालवल्यानंतर काही दिवसांनी दिलखुशची तब्येत बिघडली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला परत बोलावले. यानंतर त्यांनी पाटणा येथे फटाक्यांच्या दुकानात काम केले आणि मारुती 800 चालविण्याची नोकरीही मिळवली. दिलखुशच्या वडिलांनाही खूप कमी पगार मिळायचा. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचं शिक्षण चांगलं होऊ शकलं नाही. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी लग्नही झाले होते.
जवळपास 500 लोकांना रोजगार
दिलखुश यांनी 2016 मध्ये त्यांची AryaGo कंपनी स्थापन केली. याशिवाय त्यांनी रॉडबेझ नावाची कॅब कंपनीही स्थापन केली आहे. आज त्यांच्या कंपनीच्या नेटवर्कमध्ये सुमारे 4000 कार आहेत. या माध्यमातून ते जवळपास 500 लोकांना रोजगार देत आहेत. 29 वर्षांचे दिलखुश आज अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. सध्या त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"