जिद्दीला सलाम! इंजिनिअरिंगमध्ये सतत नापास...; आता आहे 25 कोटींच्या कंपनीचा मालक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 03:01 PM2024-03-28T15:01:50+5:302024-03-28T15:02:53+5:30

Sandeep Jangra : पिझ्झा गॅलेरियाचे संस्थापक संदीप जांगरा, ज्यांनी आपल्या बिझनेस आयडियाने अपयशाचं रूपांतर यशात केलं आहे.

success story of pizza galleria founder Sandeep Jangra turnover 25 crore | जिद्दीला सलाम! इंजिनिअरिंगमध्ये सतत नापास...; आता आहे 25 कोटींच्या कंपनीचा मालक

फोटो - hindi.news18

परीक्षांमध्ये अनेक जण नापास होतात. पण ते आपली जिद्द सोडत नाहीत. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. पिझ्झा गॅलेरियाचे संस्थापक संदीप जांगरा, ज्यांनी आपल्या बिझनेस आयडियाने अपयशाचं रूपांतर यशात केलं आहे. हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील गोहाना परिसरात राहणाऱ्या संदीप जांगरा यांनी कोट्यवधींची उलाढाल असलेली पिझ्झा कंपनी सुरू केली आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. आयुष्यात वारंवार अपयशाचा सामना करणाऱ्या संदीप जांगरा यांची यशोगाथा जाणून घेऊया...

पिझ्झा गॅलेरियाचे संस्थापक संदीप जांगरा हे सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील सुतार होते. वडिलांच्या कमाईतून कुटुंबाच्या गरजा भागत होत्या, पण जगण्यासाठी ते पैसे पुरेसे नव्हते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी संदीप यांनी लहान वयातच एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबीयांना याची माहिती नव्हती.

मित्रांना पाहून संदीपने 2009 मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र, त्यांना अभ्यासात रस नसल्याने ते वारंवार परीक्षेत नापास झाले. अशाप्रकारे त्यांनी नंतर शिक्षण पूर्ण केलं. कॉलेज सोडल्यानंतर त्यांना गुरुग्राममधील एका कंपनीत नोकरी लागली जिथे 9000 रुपये पगार मिळाला. मात्र, दोन वर्षे काम करूनही त्यांचा पगार तेवढाच होता. जे काही कमावले ते खर्च केले. यामुळे निराश होऊन ते नोकरी सोडून घरी गेले. 

संदीप सांगतात की, 2015 मध्ये गुरुग्राममध्ये राहत असताना त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला होता. पिझ्झा खाताच त्याला वाटलं की तो किती स्वादिष्ट आहे आणि भाज्यांचा वापर करून किती छान तयार झाला आहे. येथूनच त्यांना छोट्या शहरात पिझ्झा स्टोअर सुरू करण्याची कल्पना सुचली. मात्र, त्यांनी आधी पिझ्झा बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आणि काही महिने पिझ्झा बनवण्याचे कामही केले. संदीप यांच्या आईने प्रशिक्षण घेण्यासाठी पूर्ण मदत केली आणि दागिने विकून त्यांच्यासाठी पैसे उभे केले.
 

Web Title: success story of pizza galleria founder Sandeep Jangra turnover 25 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.