कडक सॅल्यूट! 9 वर्षांपूर्वी पतीने सोडलं, 'तिने' एकटीने 2 मुलांना सांभाळलं; झाली उपजिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 03:45 PM2022-11-10T15:45:57+5:302022-11-10T15:57:05+5:30

आशा कंदारा यांनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (आरएएस निकाल) उत्तीर्ण होऊन एक नवा आदर्श ठेवला आहे.

success story of rajasthan deputy collector asha kandara single mother success story ras result | कडक सॅल्यूट! 9 वर्षांपूर्वी पतीने सोडलं, 'तिने' एकटीने 2 मुलांना सांभाळलं; झाली उपजिल्हाधिकारी

कडक सॅल्यूट! 9 वर्षांपूर्वी पतीने सोडलं, 'तिने' एकटीने 2 मुलांना सांभाळलं; झाली उपजिल्हाधिकारी

googlenewsNext

जर तुमच्या मनात एखादी गोष्ट करण्याची जिद्द असेल आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर खूप कठीण प्रवासही सहज पूर्ण होऊ शकतो. जोधपूर महापालिकेत सफाई सफाई कर्मचारी असलेल्या आशा कंदारा यांची अशीच प्रेरणादायी गोष्ट आहे. आशा या दोन मुलांची सिंगल मदर आहेत. सध्या त्यांच्या यशाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 

आशा कंदारा यांनी राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षा (आरएएस निकाल) उत्तीर्ण होऊन एक नवा आदर्श ठेवला आहे. त्यांनी समाज, कुटुंब, वय या कोणत्याच गोष्टीचा विचार केला नाही. फक्त स्वतःसाठीच एक ध्येय ठेवले आणि ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करून दाखवले. उपजिल्हाधिकारी झाल्या. आशा कंदारा यांची यशोगाथा जाणून घेऊया...

पतीने 9 वर्षांपूर्वी सोडलं

आशा कंदारा यांच्या पतीने 9 वर्षांपूर्वी त्यांना आणि त्यांच्या दोन मुलांना सोडलं. यानंतर आशा कंदारा यांच्यासमोर दोन पर्याय होते - त्यांना हवे असेल तर त्या घरी रडत बसतील किंवा स्वत:च्या पायावर उभ्या राहून आपल्या मुलांचे भविष्य घडवतील. त्यांनी दुसरा पर्याय निवडला आणि जोधपूर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या.

आयएएस होण्याचं होतं स्वप्न

आई-वडिलांच्या मदतीने आशा कंदारा यांनी आपले शिक्षण पूर्ण केलं. ग्रॅज्युएशनची डिग्री घेतल्यानंतर त्या राजस्थान प्रशासकीय सेवा परीक्षेसाठी बसल्या आणि यशस्वी झाल्यानंतर उपजिल्हाधिकारी झाल्या. दोन मुलांसह हे स्थान मिळवणे त्याच्यासाठी सोपे नव्हते पण त्यांनी ते करून दाखवलं. त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होतं पण वयाची मर्यादा असल्याने त्या करू शकल्या नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: success story of rajasthan deputy collector asha kandara single mother success story ras result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.