...म्हणून तिनं सोडलं Miss Indiaचं स्वप्न, अन् क्रॅक केली UPSC, खूप खास आहे तिचा प्रवास 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 10:53 AM2023-07-12T10:53:28+5:302023-07-12T10:54:01+5:30

Success Story: ब्युटी विथ ब्रेनचं उदाहरण म्हणून तस्कीन खान यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्यांचं पुढचं लक्ष्य होतं मिस इंडिया. मात्र नंतर तस्किन यांनी एक वेगळं स्वप्न पाहिलं. त्या ग्लॅमरचं जगत सोडून थेट ब्युरोक्रसीच्या जगात पाऊल ठेवलं. आता यूपीएससी क्लिअर करून त्या थेट अधिकारी बनणार आहेत.

Success Story: ...so she gave up her dream of Miss India, and cracked UPSC, Taskin Khan's journey is very special | ...म्हणून तिनं सोडलं Miss Indiaचं स्वप्न, अन् क्रॅक केली UPSC, खूप खास आहे तिचा प्रवास 

...म्हणून तिनं सोडलं Miss Indiaचं स्वप्न, अन् क्रॅक केली UPSC, खूप खास आहे तिचा प्रवास 

googlenewsNext

ब्युटी विथ ब्रेनचं उदाहरण म्हणून तस्कीन खान यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. तस्कीन यांनी आपलं सौंदर्य, लुक्स आणि टॅलेंटच्या जोरावर सुरुवातील मॉडेलिंगच्या जगात आपलं स्थान निर्माण केलं होतं. त्यांनी अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या. तसेच मिस उत्तराखंडचं विजेतेपदही जिंकलं होतं. त्यांचं पुढचं लक्ष्य होतं मिस इंडिया. मात्र नंतर तस्किन यांनी एक वेगळं स्वप्न पाहिलं. त्या ग्लॅमरचं जगत सोडून थेट ब्युरोक्रसीच्या जगात पाऊल ठेवलं. आता यूपीएससी क्लिअर करून त्या थेट अधिकारी बनणार आहेत.

तस्कीन खान एक व्यावसायिक मॉडेल आहेत. त्याशिवाय एक बास्केटबॉल चॅम्पियन आणि एक नॅशनल लेव्हलच्या डिबेटर आहेत. त्यांनी सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि विजय मिळवला. त्यांनी नॅशनल लेव्हलवर मिस इंडिया स्पर्धेचा विजय मिळवण्याचं स्वप्न पाहिलं. तस्कीन ह्या सुरुवातीला अभ्यासामध्ये एवढ्या हुशार नव्हत्या. त्यांचा गणित हा विषय कच्चा होता. मात्र १० वी आणि १२वी मध्ये त्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.

यूपीएससीचा अभ्यास करत असताना त्यांना इन्स्टाग्रामवर एक फॉलोअर भेटले. ते आयएएस उमेदवार होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत तस्कीन यांनी सिव्हिल सर्व्हिसमध्ये जाण्याचा विचार केला. यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी त्या मुंबईत आल्या. तसेच जामियाच्या फ्रि कोचिंगमधून त्यांनी तयारी सुरू केली. त्यानंतर २०२० मध्ये त्या दिल्लीला गेल्या.

घरातील आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती. यूपीएससी २०२२च्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया ७३६ वी रँक मिळवून यश मिळवलं. तस्कीन यांचे वडील आफताब खान ऑर्डिनन्स फॅक्टरीमध्ये डी श्रेणीतील कर्मचारी होते. यूपीएससी २०२२ च्या तयारीदरम्यान, त्यांचे वडील आजारी होते. तसेच ते चार महिने रुग्णालयात होते. जेव्हा तस्कीन यूपीएससी सिव्हिल मेन्स परीक्षेमध्ये सहभागी झाली. तेव्हा तिचे वडील आयसीयूमध्ये भरती होते. मात्र तिने प्रत्येक आव्हानावर मात केली. आता ती एक सिव्हिल सर्व्हंट बनणार आहे.  

Web Title: Success Story: ...so she gave up her dream of Miss India, and cracked UPSC, Taskin Khan's journey is very special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.