कष्टाचं फळ! कम्प्यूटर ऑपरेटरची नोकरी करणारा झाला तहसीलदार; 'असं' पूर्ण केलं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 05:33 PM2023-04-18T17:33:50+5:302023-04-18T17:34:39+5:30
हबीब उर रहमान यांनी पोलिसात नोकरी करत असतानाच नागरी सेवेत रुजू होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.
जेव्हा काहीतरी करण्याची प्रचंड इच्छा असते, तेव्हा फक्त टार्गेटवर लक्ष केंद्रित करा आणि ते साध्य करेपर्यंत सोडू नका. हबीब उर रहमानची गोष्टही अशीच अत्यंत प्रेरणादायी आहे. हबीब उर रहमान हे पोलीस विभागात कम्प्यूटर ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. तेथून तयारी करतच ते तहसीलदार पदापर्यंत पोहोचले. तहसीलदार होण्यापूर्वी त्यांनी लोअर पीसीएसमध्ये मार्केटिंग ऑफिसर पदापर्यंत यश मिळवलं होतं.
हबीब उर रहमान यांनी पोलिसात नोकरी करत असतानाच नागरी सेवेत रुजू होण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. येथून त्यांना प्रेरणाही मिळाली. त्यासाठी ते रोज पाच तास अभ्यास करायचे. संयम, सातत्य आणि उत्तम मार्गदर्शन यातूनच यश मिळते, असे त्यांचे मत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हबीब हे गोंडा येथील रहिवासी आहे.
आयटी फैजाबादमधून 2010 मध्ये त्यांनी बीटेक केले. हबीब अभ्यासात चांगले होते, यासाठी त्यांना सुवर्णपदकही मिळाले. बीटेक पूर्ण झाल्यावर ते एका खासगी कंपनीत नोकरीला लागले, पण अभ्यास करत राहिले आणि सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत राहिले. 2014 मध्ये त्यांना पोलीस विभागात कम्प्यूटर ऑपरेटर म्हणून नोकरी मिळाली.
नोकरी मिळाल्यानंतरच त्यांना नागरी सेवेत रुजू होण्याची प्रेरणा मिळाली. हबीब यांचा मित्र हरेंद्रसिंग राठोड यानेही या तयारीला पूर्ण सहकार्य केले. हबीब यांना हरेंद्रचे चांगले मार्गदर्शन मिळाले. 2016 मध्ये पीसीएस परीक्षेअंतर्गत परीक्षा दिली होती. निकाल लागला त्यावेळी राज्यात यूपीपीसीएसमध्ये 633 उमेदवारांची निवड झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"