"जीसॅट-9" चं यशस्वी उड्डाण, उपग्रह प्रक्षेपणात भारताचे पुढचं पाऊल
By admin | Published: May 5, 2017 05:04 PM2017-05-05T17:04:05+5:302017-05-05T17:36:46+5:30
दक्षिण आशियाई उपग्रह "जीसॅट-9" या दक्षिण आशिया दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे. उपग्रह प्रक्षेपणात भारताचे हे पुढचं पाऊल आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीहरीकोटा, दि. 5 - "जीसॅट-9" या दक्षिण आशियाई दूरसंचार उपग्रहाचे उड्डाण भरले आहे. उपग्रह प्रक्षेपणात भारताचे हे पुढचं पाऊल आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेकडून (इस्रो)या उपग्रहाचं प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आले. या भूस्थिर दूरसंचार उपग्रहाची बांधणी इस्रोने केली असून, येथून सुमारे 100 किलोमीटरवरील श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रावरून आज (शुक्रवारी) सायंकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी आकाशात सोडण्यात आले.
सार्क देशांच्या आठपैकी भारतासह सात देश या प्रकल्पाचे सदस्य आहेत. पाकिस्तानने ‘आमचा स्वत:चा अवकाश कार्यक्रम’ असल्याचे सांगून या प्रकल्पातून अंग काढून घेतले आहे. त्यामुळे सार्कऐवजी "दक्षिण आशियाई उपग्रह" असे या उपग्रहाचे नामकरण करण्यात आले आहे.
या उपग्रहामुळे दक्षिण आशियायी देशांच्या परस्परांतील संपर्काला उत्तेजन मिळेल, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी गुरुवारी सांगितले होते.
इस्रोचा अग्निबाण जीएसएलव्ही-एफ09 ने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. याला 235 कोटी रुपये खर्च आला असून, तो शेजारच्या देशांना 12 केयू बँड ट्रान्सपाँडर्समार्फत सेवा देईल. या उपग्रहाचे आयुष्य 12 वर्षांचे आहे. या उपग्रहाचा उद्देश हा दक्षिण अशियायी भागात देशांना दूरसंचार आणि संकटकाळात मदत आणि परस्परांत संपर्क उपलब्ध व्हावा असा आहे. या उपग्रहामुळे सहभागी देशांना डीटीएच, काही विशिष्ट व्हीसॅट क्षमता उपलब्ध करून देईल. याशिवाय देशांना संकटकाळी एकमेकांना माहिती पाठवण्यास मदत करील, असे कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान बनल्यावर त्यांनी इस्रोला सार्क उपग्रह विकसित करण्यास सांगितले होते. या उपग्रहाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये नेपाळमधल्या 18 व्या सार्क परिषदमध्ये मांडली होती.
हा उपग्रह भारताकडून शेजारच्या देशांना भेट दिला जाऊ शकेल, असा त्यांचा विचार होता. 30 एप्रिल रोजी मोदी यांनी आकाशवाणीवरील त्यांच्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमात दक्षिण आशिया उपग्रह हा शेजारच्या देशांना भारताकडून अमूल्य भेट असेल, असे जाहीर केले होते.
उपग्रहाची आणि प्रक्षेपणाची वैशिष्ट्ये
उपग्रहाचे वजन २२३० किलो
उपग्रहाचा कार्यकाल १२ वर्षांपेक्षा जास्त
GSLV या प्रक्षेपकाद्वारे - रॉकेटेद्वारे उपग्रहाचे प्रक्षेपण
GSLV मध्ये स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन
स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनचा वापर केलेले GSLV चे सलग चौथे यशस्वी उड्डाण
आत्तापर्यंत GSLV प्रक्षेपकाची 10 पैकी 5 उड्डाण अयशस्वी ठरल्यानं GSLV ला नॉटी बॉय ( naughty boy ) म्हणूनही ओळख
#WATCH: ISRO launches South Asia Satellite GSAT-9 from Andhra Pradesh"s Sriharikota. pic.twitter.com/wbANKY4yq2
— ANI (@ANI_news) May 5, 2017
Successful launch of South Asian Satellite is a historic moment. It opens up new horizons of engagement: PM Narendra Modi pic.twitter.com/GpCDgN8HDF
— ANI (@ANI_news) May 5, 2017
ISRO launches South Asia Satellite GSAT-9 from Andhra Pradesh"s Srikharikota. pic.twitter.com/59ElQn26n0
— ANI (@ANI_news) May 5, 2017