जी सॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Published: November 11, 2015 09:43 AM2015-11-11T09:43:55+5:302015-11-11T09:47:54+5:30

भारताच्या जी सॅट १५ या दूरसंचार उपग्रहाचे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. फ्रेंच गयानामधील कौराऊ केंद्रावरुन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे.

Successful launch of GSAT 15 | जी सॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण

जी सॅट १५ चे यशस्वी प्रक्षेपण

Next

ऑनलाइन लोकमत 

बेंगळुरु, दि. ११ -  भारताच्या जी सॅट १५ या दूरसंचार उपग्रहाचे मंगळवारी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. फ्रेंच गयानामधील कौराऊ केंद्रावरुन उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. 

जी सॅट उपग्रहाचे वजन ३,१६४ किलो असून त्यावर २४ केयू बँड ट्रान्सपॉडर आहेत. गगन ही दिशादर्शक प्रणालीही उपग्रहात असणार आहे. फ्रेंच गयानामधून भारतीय वेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास एरिन ५ व्हीए २२७ या प्रक्षेपकामार्फत उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतासोबतच सौदी अरेबियाच्या अरबसॅट ६बी या उपग्रहाचेही प्रक्षेपण करण्यात आले आहे.आगामी काळात जीसॅट १७ आणि जीसॅट १८ या उपग्रहांचे प्रक्षेपण केले जाईल अशी माहिती इस्त्रोने दिली.  

 

Web Title: Successful launch of GSAT 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.