अत्याधुनिक दळणवळण उपग्रह जीसॅट ६ चे यशस्वी प्रक्षेपण
By admin | Published: August 27, 2015 05:22 PM2015-08-27T17:22:24+5:302015-08-27T17:22:24+5:30
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा यशस्वी झेप घेतली असून जीसॅट ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीहरिकोटा, दि. २७ - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) अंतराळ क्षेत्रात पुन्हा एकदा यशस्वी झेप घेतली असून जीसॅट ६ या अत्याधुनिक दळणवळण उपग्रहाचे गुरुवारी श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारतीय बनावटीचा हा २५ वा दळणवळण उपग्रह आहे.
गुरुवारी संध्याकाळी ४ वाजून ५२ मिनीटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथे जीसॅट ६ हे उपग्रह अंतराळाच्या दिशेने झेपावले. क्युबिक आकाराच्या या उपग्रहाचे एकूण वजन २११७ किलो असून त्यात ११३२ किलो इंधन असेल. उपग्रहाचे निव्वळ वजन ९८५ किलो राहील. त्यात घडी न होणारा सहा मीटर व्यास असलेला सी- बँड अँटेना आजवरचा सर्वात मोठा अँटेना ठरणार आहे.
जीसॅट- ६ हा उपग्रह दळणवळणाची अत्याधुनिक सुविधा पुरविणार आहे. या मोहिमेचे आयुष्य ९ वर्षांचे असेल.