भारताच्या GPS उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, अमेरिकेच्या तोडीची सेवा देणे शक्य

By admin | Published: April 28, 2016 03:29 PM2016-04-28T15:29:16+5:302016-04-28T18:49:54+5:30

आयआरएसएसएस-१ जी मालिकेतील सातव्या आणि अंतिम दिशादर्शक उपग्रहाचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज (गुरुवारी) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण केले.

Successful launch of India's GPS satellites, it is possible to serve the US | भारताच्या GPS उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, अमेरिकेच्या तोडीची सेवा देणे शक्य

भारताच्या GPS उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण, अमेरिकेच्या तोडीची सेवा देणे शक्य

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीहरीकोटा, दि. २८ : आयआरएसएसएस-१ जी मालिकेतील सातव्या आणि अंतिम दिशादर्शक उपग्रहाचे  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) आज (गुरुवारी) श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन यशस्वी प्रक्षेपण केले. आयआरएसएसएस-१ जी उपग्रहाचे वजन १४२५ किलो आहे. या अंतिम दिशादर्शक उपग्रहामुळे भारताने क्षेत्रीय दिशादर्शक यंत्रणा पुर्ण केली आहे. यामुळे भारताला आता  इतर देशाच्या सॅटलाईवर अवलंबून राहण्याची गरज नाही. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम असणाऱ्या ५ देशामध्ये भारताचा समावेश झाला आहे. 
 
दुपारी प्रक्षेपक अवकाशात झेपावल्यानंतर हा उपग्रह भूस्थिर कक्षेत सोडला गेला. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) सात दिशादर्शक उपग्रहांच्याप्रक्षेपणाची योजना आखली असून आयआरएसएसएस-१ जी हा या मालिकेतील शेवटचा उपग्रह आहे.
त्यामुळे भारताला अमेरिकेच्या जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम) या स्थितीदर्शक यंत्रणेच्या तोडीची सेवा देणे शक्य होणार आहे.
गुरुवारी झालेले सदर उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजितरीत्या तंतोतंत (कॉपीबुक स्टाईल) पार पडले. यापूर्वी जुलै २०१३ मध्ये या मालिकेतील पहिल्या उपग्रहाचे प्रक्षेपण झाले होते.
 
उड्डाणानंतर वीस मिनिटांनी पीएसएलव्हीने आयआरएनएसएस - १ एफला अवकाश कक्षेत स्थिर केले. या दिशादर्शक उपग्रह प्रणालीचा सर्वसामान्य वापरकर्त्यांना प्रवासामध्ये दिशा समजून घेण्यासाठी  फायदा होणार आहे.
भारताला लागून असणा-या सर्व सीमांवरील १५०० किमीचा प्रदेश या उपग्रहाच्या कक्षेत येणार आहे. ही दिशादर्शक प्रणाली विकसित करण्यासाठी १४०० कोटी रुपयांचा खर्च आला असून, या मालिकेतील सातवा उपग्रह मार्च अखेरपर्यंत प्रक्षेपित करण्याची योजना आहे. 
 

Web Title: Successful launch of India's GPS satellites, it is possible to serve the US

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.