भारताच्या जी सॅट १८ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Published: October 7, 2016 02:11 AM2016-10-07T02:11:38+5:302016-10-07T02:11:38+5:30

भारताचा नवीन संचार उपग्रह जी सॅट १८ चे गुरुवारी फ्रेंच गुआनाच्या कोउरू अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे देशाच्या संचार सेवेत सुधारणा होणार

Successful launch of India's GSAT 18 | भारताच्या जी सॅट १८ चे यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या जी सॅट १८ चे यशस्वी प्रक्षेपण

Next

बंगळुरू : भारताचा नवीन संचार उपग्रह जी सॅट १८ चे गुरुवारी फ्रेंच गुआनाच्या कोउरू अंतराळ केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण झाले. यामुळे देशाच्या संचार सेवेत सुधारणा होणार आहेत.
जी सॅट १८ ने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) सध्याच्या १४ संचार उपग्रहाच्या संचाला आणखी बळ मिळवून दिले आहे.
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.  मोदी यांनी ट्विट केले आहे की, इस्रोला शुभेच्छा. आमच्या अंतराळ कार्यक्रमातील हा मैलाचा दगड आहे. देशाच्या संचार क्षेत्रात यामुळे मोठे बदल होणार असल्याचे इस्रोचे अध्यक्ष ए.एस. किरण कुमार यांनी म्हटले आहे. युरोपीय अंतराळ एजन्सीकडून प्रक्षेपित होणारा हा इस्रोचा २० वा उपग्रह आहे.

Web Title: Successful launch of India's GSAT 18

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.