भारताच्या IRNSS- 1E उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
By admin | Published: January 20, 2016 09:39 AM2016-01-20T09:39:02+5:302016-01-20T12:54:06+5:30
श्रीहरीकोटा येथून इस्त्रोच्या ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या उपग्रहाचे 'पीएसएलव्ही-सी ३१'मधून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
Next
ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २० - इस्रोच्या (भारतीय अवकाश संशोधन संस्था) ‘आयआरएनएसएस-१’ या पाचव्या दिशादर्शक उपग्रहाचे श्रीहरीकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. 'पीएसएलव्ही-सी ३१’ या प्रक्षेपकाच्या माध्यमातून आज सकाळी या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण झाल्याने असून नवीन वर्षात इस्त्रोची पहिली मोहीम यशस्वी ठरली. झाले. चेन्नईहून सुमारे १०० किमी दूर असलेल्या श्रीहरीकोटा येथून बुधवारी सकाळी ९ वाजून ३१ मिनिटांनी या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले. ४४.४ मीटर इतकी उंची असलेल्या या उपग्रहाचे वजन १४२५ ग्रॅम इतके आहे. या यशस्वी उड्डाणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्त्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.
भारताने आत्तापर्यंत चार दिशादर्शक उपग्रह (आयआरएनएसएस-१ए, १बी, १सी आणि १डी) अवकाशात सोडले आहेत. १ जुलै २०१३ साली आयआरएनएसएस-१ए, तर एप्रिल २०१४ मध्ये आयआरएनएसएस-१बी प्रक्षेपित करण्यात आले. १६ ऑक्टोबर २०१४ साली आयआरएनएसएस- १सी आणि २८ मार्च २०१५ मध्ये आयआरएनएसएस-१डी चे यशस्वी प्रक्षेपण झाले. अवकाशातील सात व पृथ्वीवरील दोन अशा एकूण नऊ उपग्रहांच्या साहाय्याने भारतीय दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती "इस्त्रो‘तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
- भारताने आज पीएसलव्ही -सी ३१ या प्रक्षेपकाव्दारे IRNSS- 1E या पाचव्या दिशादर्शन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
- पुढच्या दोन महिन्यात आणखी दोन दिशादर्शक उपग्रह अवकाशात पाठवण्यात येणार असून, त्यानंतर भारताची स्वत:ची दिशादर्शक यंत्रणा कार्यान्वित होईल.
- याआधी पाठवण्यात आलेल्या चार दिशादर्शक उपग्रहांनी आपले काम सुरु केले आहे.
- भारताची दिशादर्शक यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत जगातील असा चौथा देश असेल ज्याच्याकडे स्वत:ची उपग्रह आधारीत दिशादर्शक यंत्रणा असेल. अमेरिकेच्या तोडीची जीपीएस यंत्रणा भारताकडे असेल.
- या दिशादर्शक यंत्रणेमुळे भारताच्या ज्या सीमा आहेत त्या अधिक सुरक्षित होणार असून, लष्कराला विशेषकरुन क्षेपणास्त्र लक्ष्यभेद करण्यासाठी मदत मिळणार आहे.
- भारताच्या भरवशाच्या पीएसएलव्ही प्रक्षेपकाव्दारे केलेले हे ३३ वे यशस्वी प्रक्षेपण होते. इस्त्रोची नव्या वर्षातील ही पहिलीच मोहिम असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.
PSLV, in its 33rd flight (PSLV-C31), launches IRNSS-1E, the fifth satellite of the IRNSS from Sriharikota. pic.twitter.com/xSYprTuSKY
— ANI (@ANI_news) January 20, 2016