सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 06:44 AM2023-07-31T06:44:06+5:302023-07-31T06:45:10+5:30

इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. 

Successful launch of 7 Singapore satellites by ISRO; Including 360 kg 'DS-SAR' | सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश

सिंगापूरच्या 7 उपग्रहांचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; ३६० किलो वजनी ‘डीएस-एसएआर’चा समावेश

googlenewsNext

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून रविवारी सकाळी ६:३० वाजता सिंगापूरच्या सात उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. हे प्रक्षेपण ४४.४ मीटर लांबीच्या पीएसएलव्ही-सी ५६ रॉकेटने केले. इस्रोने सांगितले की, प्रक्षेपणानंतर २३ मिनिटांनी प्राथमिक उपग्रह वेगळा झाला. यानंतर, उर्वरित ६ उपग्रहदेखील वेगळे झाले आणि सर्व त्यांच्या कक्षेत पोहोचले. पीएसएलव्हीचे हे ५८ वे उड्डाण होते. 

सरकारी संस्थांसाठी ठरणार उपयोगी
पाठविलेल्या सात उपग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचा ३६० किलोंचा डीएस-एसएआर उपग्रह आहे. तो सिंगापूरच्या संरक्षण विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था (डीएसटीए) आणि सिंगापूरच्या एसटी अभियांत्रिकी यांच्यातील भागीदारीअंतर्गत विकसित केला आहे. सिंगापूर सरकारच्या विविध संस्थांच्या उपग्रह प्रतिमांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या उपग्रहाचा वापर केला जाईल. त्यात इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजतर्फे (आयएआय) विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (एसएआर) बसविलेले आहे.

या महिन्यात बहुप्रतीक्षित चंद्रयान-३ लाँच केल्यानंतर, ही इस्रोची आणखी एक समर्पित मोहीम आहे, याचे नेतृत्व इस्रोची व्यावसायिक शाखा ‘न्यू स्पेस इंडिया लिमिटेड’ने केले आहे. 
 

Web Title: Successful launch of 7 Singapore satellites by ISRO; Including 360 kg 'DS-SAR'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.