४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर उदयपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Published: May 18, 2017 04:16 AM2017-05-18T04:16:03+5:302017-05-18T09:37:17+5:30

मुदतीपूर्व जन्माला आलेल्या अवघ्या ४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देत राजस्थानच्या डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना अपत्यसुख प्राप्त करून दिले.

Successful operation in Udaipur, 470 grams | ४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर उदयपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर उदयपुरात यशस्वी शस्त्रक्रिया

Next

उदयपूर : मुदतीपूर्व जन्माला आलेल्या अवघ्या ४७० ग्रॅम वजनाच्या बाळावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन देत राजस्थानच्या डॉक्टरांनी त्याच्या आई-वडिलांना अपत्यसुख प्राप्त करून दिले.
२८ आठवड्यांनंतर मुदतीपूर्वी जन्माला आलेल्या बाळाची स्थिती नाजूक होती. डोळेही पूर्णत: उघडलेले नव्हते. फुफ्फुसांची वाढही झालेली नव्हती. त्वचा तर चर्मकागदासारखीच होती.
लग्न होऊन अनेक वर्षे होऊनही अपत्य सुखासाठी तळमळणाऱ्या या जोडप्याला अखेर आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) पद्धती वरदान ठरली. मात्र बाळाच्या हृदयात गुंतागुंत होती. त्यावर एकच उपाय होता, तो हृदयावर शस्त्रक्रिया करणे.
ही जोखीम पत्करत गीतांजली मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या नाजूक बाळावर अत्यंत आव्हानात्मक समजली जाणारी शस्त्रक्रिया यशस्वी करून भारताच्या विशेषत: राजस्थानच्या वैद्यकीय इतिहासाला एका नवा अध्यायच जोडला.
एवढेच नाही तर आधुनिक वैद्यकीय तंत्रशास्त्राचा वापर करून भारतातही अशा नाजूक स्थितीत जन्माला आलेल्या बाळांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून नवजीवन देता येऊ शकते, हेही सिद्ध करून दाखविले. (वृत्तसंस्था)

हृदयातील दोन रक्तवाहिन्या होत्या चिकटलेल्या...
- परिणामी बाळाला मोकळा श्वास घेण्यात अडचण होती. बाळाला तज्ज्ञ डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. सर्वसाधारणपणे मातेच्या उदरातील अर्भकाच्या या दोन्ही रक्तवाहिन्या चिकटलेल्या असतात. प्रसूतीनंतर जन्माला आल्यानंतर बाळाच्या हृदयातील दोन्ही रक्तवाहिन्या आपोआप वेगळ्या होतात. जन्माला आल्यानंतरही हा दोष राहिल्यास औषधोपचार करून हा दोष दूर करता येतो. तथापि, औषधोपचारानंतर दोष कायम राहिल्याचे आढळल्यास शस्त्रक्रिया हाच शेवटचा पर्याय असतो.
- शस्त्रकियेद्वारे आईने बाळाला जन्म दिला. ही सुखद वार्ता बाळाच्या आई-वडिलांसाठी क्षणभरच सुखावून गेली. तपासणी डॉक्टरांना आढळले की, बाळाच्या हृदयातील दोन्ही मुख्य रक्तवाहिन्या (महाधमनी आणि फुफ्फुस रोहिणी) एकमेकांना चिकटलेल्या होत्या.

Web Title: Successful operation in Udaipur, 470 grams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.