हवामान उपग्रह इन्सॅट-३डीआरचे यशस्वी प्रक्षेपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 06:01 PM2016-09-08T18:01:36+5:302016-09-08T18:13:43+5:30
भारताच्या जीएसएलव्ही-एफ०५ प्रक्षेपकाने गुरुवारी इन्सॅट-३डीआर या अत्याधुनिक हवामान उपग्रहाला यशस्वीरित्या अवकाश कक्षेत स्थिर केले.
ऑनलाइन लोकमत
श्रीहरीकोटा, दि. ८ - भारताच्या जीएसएलव्ही-एफ०५ प्रक्षेपकाने गुरुवारी इन्सॅट-३डीआर या अत्याधुनिक हवामान उपग्रहाला यशस्वीरित्या अवकाश कक्षेत स्थिर केले. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रावरुन जीएसएलव्ही -एफ०५ ने ४.५० मिनिटांनी उड्डाण केले.
उड्डाणानंतर १७ मिनिटांनी इन्सॅट-३डीआर कक्षेत स्थिर झाला. पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आलेल्या जीएसएलव्ही -एफ०५ चे हे पहिले ऑपरेशनल उड्डाण होते.
जीएसएलव्ही काही तपासण्या बाकी असल्याने हे उड्डाण नियोजित वेळेपेक्षा ४० मिनिट उशिराने झाले. इन्सॅट-३ डी कडून समृद्राच्या पुष्ठभागाचे तापमान, बर्फ, ढग आणि धुके याविषयी महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे.