भारतीय नौदलाकडून बराक ८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By admin | Published: December 30, 2015 05:52 PM2015-12-30T17:52:56+5:302015-12-30T17:57:35+5:30
हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने बुधवारी जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या बराक ८ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने बुधवारी जमिनीवरून हवेत मारा करण्याची क्षमता असलेल्या लांब पल्ल्याच्या बराक ८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
आयएनएस कोलकता या लढाऊ जहाजावरून बुधवारी सकाळी घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान लांब पल्ल्यावर निश्चित करण्यात आलेल्या एका लक्ष्यावर या क्षेपणास्त्राने अचूक निशाणा साधला. भारतीय नौदलाने हवाई संरक्षणात ही मोठी झेप घेतली असून, त्याबद्दल संरक्षण मंत्रालयाने आनंद व्यक्त केला. या यंत्रणेत क्षेपणास्त्राशिवाय बहुआयामी टेहळणी करणारे व धोक्याची सूचना देणारे रडारही आहे.