ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

By admin | Published: November 1, 2015 11:58 PM2015-11-01T23:58:49+5:302015-11-01T23:58:49+5:30

‘आयएनएस कोची’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरून रविवारी पहिल्यांदाच सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Successful test of BrahMos missile | ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Next

नवी दिल्ली : ‘आयएनएस कोची’ या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवरून रविवारी पहिल्यांदाच सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ब्रह्मोस एअरोस्पेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर ‘कोलकाता श्रेणी’तील दुसरी युद्धनौका ‘आयएनएस कोची’वरून ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
ब्रह्मोस हे जगातील सर्वांत वेगवान क्रूझ क्षेपणास्त्रांपैकी एक आहे आणि रविवारी घेण्यात आलेल्या चाचणीदरम्यान या क्षेपणास्त्राने आपल्या क्षमतेनुरूप २९० कि. मी. अंतरावरील लक्ष्य अचूकपणे भेदले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Successful test of BrahMos missile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.