बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1'ची यशस्वी चाचणी, खासियत जाणून शत्रूलाही भरेल धडकी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 12:28 AM2023-12-08T00:28:25+5:302023-12-08T00:29:28+5:30
1000KG अण्वस्त्रं वाहून नेण्याची क्षमता...!
भारताने गुरुवारी मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1'चे यशस्वीपणे ट्रेनिंग लॉन्च केले. यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून मध्यम पल्ल्याचे हे बॅलेस्टिक मिसाइल 'अग्नि-1' चे यशस्वी लॉन्चिंग करण्यात आले आहे. अग्नी-1 मिसाइलची मारक क्षमता 700 किलोमीटरपर्यंत आहे. तसेच हे मिसाईल 1000Kg अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. अग्नि 1 मिसाइल डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट लॅबोरेटरी आणि रिसर्च सेंटर इमारात यांच्या सहकार्याने प्रगत प्रणाली प्रयोगशाळेने विकसित केले आहे.
डीआरडीओच्या अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, भारताने ओडिशाच्या किनारपट्टीवरून कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-1 चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. या क्षेपणास्त्राची रेंज 700 ते 2500 किलोमीटर एवढी आहे. हे मिसाइल 15 मीटर लांब आणि 12 टन वजनाचे आहे. तसेच हे 1000 किलो पर्यंतचे पारंपरिक अण्वस्त्रे आणि क्लस्टर दारूगोळा वाहून नेऊ शकते.
हे मिसाइल मोबाइल लाॉन्चर्सच्या सहाय्याने लॉन्च केले जाऊ शकते. या मिसाइलची पहिली चाचणी 25 जानेवारी 2002 ला करण्यात आली होती. ही मिसाइल सिस्टिम भारतीय सेन्य दलाच्या स्ट्रॅजिक कमॉड फोर्सअंतर्गत येते. यापूर्वीही, कमी पल्ल्याच्या आण्विक सक्षम असलेल्या बॅलेस्टिक मिसाइल एसआरबीएम अग्नि-1 पासून ते अग्नि-5 पर्यंत मिसाइल्सचे यशस्वीपणे परीक्षण करण्यात आले आहे. ज्यांची रेन्ज 750 किलोमीटर ते 3500 किलोमीटरपर्यंत आहे.
संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे -
गेल्या वर्षी अग्नि-5 मिसाइलचेही यशस्वी परीक्षण करण्यात आले होते. याची रेन्ज पाच हजार किलो मिटर एवढी होती. हे मिसाइल एक अत्यंत शक्तिशाली शस्त्र आहे. जे भारताच्या संरक्षणात अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडू शकते.