नाग क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 04:29 AM2019-07-20T04:29:31+5:302019-07-20T04:29:34+5:30
भारतीय लष्कराने पोखरण येथील गोळीबार मैदानात तिसऱ्या पिढीतील रणगाडाभेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने पोखरण येथील गोळीबार मैदानात तिसऱ्या पिढीतील रणगाडाभेदी ‘नाग’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ७ आणि १८ जुलै दरम्यान या चाचण्या घेण्यात आल्या. कोणत्याही हवामानात शत्रुंच्या रणगाड्यांचा अचूक वेध घेणारे नाग हे क्षेपणास्त्र आहे. याचा मारक पल्ला किमान ५०० मीटर तर ४ किलोमीटर आहे. ग्रीष्म ऋतूतील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर उत्पादन आणि लष्करी ताफ्यात सामील करण्याचा मार्ग खुला होईल.