सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’ची चाचणी यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2020 03:07 AM2020-10-01T03:07:41+5:302020-10-01T03:08:02+5:30
या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली
नवी दिल्ली/बालासोर : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ‘ब्राह्मोस’च्या नव्या आवृत्तीची भारताने बुधवारी यशस्वी चाचणी केली. ओदिशातील बालासोर येथे झालेल्या या क्षेपणास्त्राचा मारा करण्याचा आवाका ४०० किलोमीटरचा आहे.
या क्षेपणास्त्रातील सब सिस्टिम्स या देशातच विकसित केल्या गेल्या आहेत. त्याच्या उड्डाणाची चाचणी सकाळी १०.३० वाजता बालासोरमधील इंटिग्रेटेड टेस्ट रेंजवर जमिनीवरील मोबाईल लाँचरवरून केली गेली. या क्षेपणास्त्राची मारा क्षमता पूर्वी २९० किलोमीटर होती ती आता ४०० किलोमीटर केली गेली आहे. त्याचा वेग मॅक २.८ राखला जाईल व तो आवाजाच्या जवळपास तीनपट आहे.
भारताने चीनला खेटून असलेल्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या प्रत्यक्ष सीमेवर व्यूहरचनेच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आधीच तैनात केली आहेत. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेच्या तुकडीतील सर्व सदस्यांचे ब्राह्मोसच्या यशस्वी चाचणीबद्दल टिष्ट्वटरवर अभिनंदन केले. हे यश भारताच्या आत्मनिर्भर प्रतिज्ञेला मोठे बळ देणारे आहे, असेही ते म्हणाले.