Video: स्वच्छता कर्मचाऱ्यांचा असाही सन्मान; चक्क न्यायाधीशांनीच धुतले पाय, फुलेही वाहिली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 02:03 PM2023-11-09T14:03:35+5:302023-11-09T14:12:22+5:30
आता ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतही न्यायाधीशांनी सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले होते. सफाई कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मोदींनी प्रयागराज येथे त्यांचे पाय धुवून त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधला होता. मोदींनी ५ सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुत त्यांचा सन्मानही केला होता. मोदींचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर, भाजपा समर्थकांनी मोदींच्या या कृत्याचं कौतुक करत पंतप्रधानांबद्दल आदर व्यक्त केला. तर, काहींनी टीकाही केली होती. आता ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतही न्यायाधीशांना सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले आहेत.
तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्ह्यातील उलुंदुरपेट नगरपालिकेने उलुंदुरपेट न्यायालयाच्या आवारात 'स्वच्छता कामगार विशेष शिबिर' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनापूर्वी न्यायाधीशांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले आणि 'पाठपूजा'ही केली. त्यानंतर, त्यांचा सन्मानही केला. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमातून समोर आला आहे. चक्क न्यायमूर्ती आपले पाय धूत असल्याने सफाई कर्मचारी महिलेला गदगदल्यासारखे झाल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. महिलेने चक्क हात जोडून आपली निशब्द भावना व्यक्त केली.
#WATCH | Kallakurichi, Tamil Nadu: Ulundurpet Municipality conducts the 'Sanitation Workers Special Camp' event on the premises of Ulundurpet Court. Before the inauguration of the event, judges washed the feet of sanitation workers and held 'patha puja'. (08.11) pic.twitter.com/ifqKfDKqPn
— ANI (@ANI) November 9, 2023
दरम्यान, सफाई कर्मचाऱ्यांमुळे आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ ठेवला जातो. परिसरातील दुर्गंधी दूर करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं. त्यामुळेच, स्वच्छता कामगारांच्या सन्मानार्थ हे विशेष शिबीर येथील न्यायपालिका व नगरपालिकेतील अधिकारी वर्गाने राबवल्याचं दिसून येत आहे.