मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी सुदाम कोंबडे

By admin | Published: February 14, 2015 11:50 PM2015-02-14T23:50:51+5:302015-02-14T23:50:51+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर निर्माण झालेल्या गटबाजीतून रिक्त असलेल्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षात पदाधिकारीच नसल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना या नियुक्तीमुळे दिलासा मिळालेला असला तरी, लवकरात लवकर शहर व जिल्‘ाची कार्यकारिणीही गठीत केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Sudam Kombade as the district president of MNS | मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी सुदाम कोंबडे

मनसेच्या जिल्हाध्यक्षपदी सुदाम कोंबडे

Next
शिक : विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर निर्माण झालेल्या गटबाजीतून रिक्त असलेल्या महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक सुदाम कोंबडे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून पक्षात पदाधिकारीच नसल्याने सैरभैर झालेल्या कार्यकर्त्यांना या नियुक्तीमुळे दिलासा मिळालेला असला तरी, लवकरात लवकर शहर व जिल्‘ाची कार्यकारिणीही गठीत केली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माजी आमदार वसंत गिते यांचे क˜र समर्थक असलेले सचिन ठाकरे यांनी मनसेवर नाराज होत भाजपाची वाट पकडल्याने जिल्हाध्यक्षपद रिक्त होते. त्यातून कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचेच लक्ष लागून असताना या पदासाठी माजी आमदार नितीन भोसले, शशिकांत जाधव यांच्या नावाची चर्चा होत होती; परंतु पक्षाने कोंबडे यांच्या नावाची घोषणा केली. नुकत्याच झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत अन्य इच्छुकांमध्ये कोंबडे यांचेही नाव आघाडीवर होते, मात्र उमेदवाराच्या निकषात त्यांचे नाव पिछाडीवर पडल्याने त्यांची संधी हुकली होती. त्याचीच परतफेड म्हणून राज ठाकरे यांनी कोंबडे यांच्यावर जिल्‘ाची जबाबदारी सोपविली. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून, पक्ष कार्यकर्तेही सैरभैर झालेले आहेत. कोणताही उपक्रम अथवा कार्यक्रम पक्षाकडून राबविण्यात न आल्याने शैथिल्य आल्यामुळे कोंबडे यांच्यासमोर पक्ष बांधणीचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
चौकट===
पक्ष बांधणीला प्राधान्य
पक्षाची झालेली पडझड पाहता, पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी जबाबदारी टाकल्याने अगोदर पक्ष बांधणी व पक्ष वाढीला प्राधान्य दिले जाईल. नवे व जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करून सर्वांना बरोबर घेऊन काम करण्यात येईल.
- सुदाम कोंबडे, नूतन जिल्हाध्यक्ष
(फोटो वापरणे)

Web Title: Sudam Kombade as the district president of MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.