एलसीबीच्या तेरा कर्मचार्यांच्या अचानक बदल्या पोलीस दलात खळबळ : निनावी तक्रारीवरुन बदल्या झाल्याची चर्चा
By Admin | Published: December 3, 2015 12:35 AM2015-12-03T00:35:41+5:302015-12-03T00:35:41+5:30
जळगाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या तेरा कर्मचार्यांच्या अचानक मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करताना या कर्मचार्यांना कोणतेच कारण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेही घेण्यात आले नाही. पोलीस दलात दबदबा असलेल्या या कर्मचार्यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनीही बदलीचे कारण सांगण्यास नकार दिला.
ज गाव: स्थानिक गुन्हे शाखेच्या तेरा कर्मचार्यांच्या अचानक मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. बदली करताना या कर्मचार्यांना कोणतेच कारण देण्यात आलेले नाही अथवा त्यांचे म्हणणेही घेण्यात आले नाही. पोलीस दलात दबदबा असलेल्या या कर्मचार्यांच्या अचानक झालेल्या बदल्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. वरिष्ठ अधिकार्यांनीही बदलीचे कारण सांगण्यास नकार दिला.असे आहेत बदली झालेले कर्मचारीसहायक फौजदार गोपाळ बळीराम चौधरी, हेडकॉन्स्टेबल भास्कर विठ्ठल पाटील, बापु फकीरा भोसले, रवींद्र मानसिंग गिरासे, चंद्रकांत सीताराम शिंदे, श्रीकृष्ण पटवर्धन, दीपक नाना शिरसाठ, सुधाकर रामदास अंभोरे, राजेंद्र राघो पाटील, दिनेशसिंग लोटू पाटील,नरेंद्र लोटन वारुळे, उषा बळीराम सोनवणे, संजय मुरलीधर पाटील आदींचा समावेश आहे. हे कर्मचारी स्थानिक गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंध, सायबर सेल,अंगुली मुद्रा, अनैतिक मानवी वाहतुक व महिला सहाय कक्ष आदी विभागात कार्यरत होते.कामाचा लेखाजोखा तपासलास्थानिक गुन्हे शाखेच्या २० कर्मचार्यांबाबतीत विशेष पोलीस महानिरीक्षक जयजीत सिंग यांच्याकडे निनावी तक्रार झाली होती. या तक्रारीवरून जयजीतसिंग यांनी काही दिवसापूर्वी या कर्मचार्यांचे शीट (कामाचा लेखाजोखा अहवाल) मागविले होते. त्यात बहुतांश कर्मचार्यांची कामगिरी चांगली आहे. तीन जणांचा तर राष्ट्रपती पुरस्कारासाठी प्रस्ताव आहे. एखाद्या व्यक्तीची निनावी तक्रार झाली तर त्याची नोंद घ्यावी, मात्र त्यावर विश्वास ठेवून कार्यवाही करून नये असे महासंचालकांचे पत्र असतानाही निनावी तक्रारीवरून या कर्मचार्यांची अचानक बदली करण्यात आली आहे.अधिकार्यांना वेगळा न्यायस्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. ते या गुन्ात संशयित आरोपी आहेत. त्यांनी बदलीचा अर्जही दिला आहे असे असताना त्यांची बदली होऊ शकत नाही व ज्यांच्याबाबतीत कोणाचीच तक्रार नाही अशा कर्मचार्यांच्या बदल्या होतात या वरिष्ठांच्या दुटप्पी भूमिकेमुळे पोलीस दलात प्रचंड नाराजी पसरली आहे.तत्काळ केले कार्यमुक्तविशेष पोलीस महानिरीक्षकांच्या पत्रानुसार पोलीस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांनी बुधवारी सकाळी या तेरा कर्मचार्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी दीपक लगड यांनी त्यांना तत्काळ कार्यमुक्त केले. या सर्वांची मुख्यालयी बदली करण्यात आली आहे.