यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 12:30 PM2020-08-11T12:30:33+5:302020-08-11T12:43:23+5:30

Sudiksha Bhati Death: सुदीक्षा भाटी अमेरिकेच्या 'बॉब्सन'मध्ये अभ्यास करत होती. 2018 मध्ये तिने सीबीएसई बोर्डच्या इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जनपदमध्ये 98 टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केलं होतं.

sudeeksha bhati us returned girl died road accident facing eve teasing bulandshahr | यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

यूपीत टवाळखोरांचा उच्छाद! अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवण्याऱ्या 'तिला' छेडछाडीत गमवावा लागला जीव

googlenewsNext

बुलंदशहर - कोरोनाच्या संकटात अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये घडली आहे. अमेरिकेत शिक्षण घेणारी भारतीय तरुणी उत्तर प्रदेशमध्ये छेडछाडीची बळी ठरली आहे. सुदीक्षा भाटी असं या तरुणीचं नाव असून स्वत:च्या मेहनतीने तिने अमेरिकेत स्कॉलरशिप मिळवली होती. सुदीक्षा अमेरिकेत शिक्षण घेते होती मात्र सध्या कोरोना काळात ती आपल्या घरी परतली होती. 

उत्तर प्रदेशमध्ये टोळक्याच्या छेडछाडीपासून स्वत: ला वाचवण्याच्या प्रयत्नात सुदीक्षाचा अपघात झाला. यामध्ये तिला आपला जीव गमवावा लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुदीक्षा अमेरिकेच्या 'बॉब्सन'मध्ये अभ्यास करत होती. बुलंदशहरच्या गौतमबुद्ध नगरच्या दादरीमध्ये सुदीक्षाचं कुटुंब स्थायिक आहे. सुदीक्षाचे वडील एक ढाबा चालवतात. ऑगस्टमध्ये ती पुन्हा अमेरिकेला परतणार होती. मात्र त्याआधीच  छेडछाडीच्या घटनेत तिला जीव गमवावा लागला आहे.

रिपोर्टनुसार, सुदीक्षा आपल्या एका नातेवाईकांसोबत बाईकवरून आपल्या मामाच्या घरी निघाली होती. या दरम्यान काही टवाळखोरांनी त्यांच्या बाईकचा पाठलाग केला आणि छेडछाड सुरू केली. त्यांनी अनेकदा सुदीक्षाच्या बाईकला ओव्हरटेकही केलं. याच दरम्यान समोरच्या बाईकला धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुदीक्षा गंभीररित्या जखमी झाली आणि तिचा मृत्यू झाला. 

सुदीक्षा भाटी अमेरिकेच्या 'बॉब्सन'मध्ये अभ्यास करत होती. 2018 मध्ये तिने सीबीएसई बोर्डच्या इंटरमीडिएटमध्ये बुलंदशहर जनपदमध्ये 98 टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केलं होतं. तिच्या या यशामुळे तिला 3 कोटी 80 लाखांची स्कॉलरशिप मिळाली. यानंतर सुदीक्षा अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेली होती. मात्र या घटनेनंतर यूपीत टवाळखोरांचा उच्छाद पाहायला मिळाला आहे. तसेच महिला सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

'सुशांतचा पाय मुरगळलेल्या अवस्थेत, तुटल्यासारखा...', सुब्रमण्यम स्वामींचा दावा, शवविच्छेदनावर उपस्थित केली शंका 

CoronaVirus News : दिलासादायक! कोरोनाच्या संकटात आशेचा किरण, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

तैवानच्या हद्दीत घुसले, मिसाईल डागलेली पाहून चिनी वैमानिक पळाले

शिकागोमध्ये हजारो लोकांनी केली लूटमार; 100 जणांना अटक, 13 अधिकारी जखमी

"देशाची साधनसंपत्ती लुटणाऱ्या मित्रांसाठी भाजपा काय करत आली याचं 'हे' भयंकर उदाहरण"

कोरोनाच्या संकटात रेल्वे देणार 5000 हून अधिक नोकऱ्या?, जाणून घ्या 'त्या' जाहिरातीमागचं सत्य

CoronaVirus News : पीपाई किट घालून आजारी पत्नीची भेट घेणाऱ्या पतीला कोरोनाची लागण अन्...; मन सुन्न करणारी घटना

CoronaVirus News : कोरोनावर मात केल्यावर शिवराज सिंह चौहान करणार प्लाझ्मादान

Read in English

Web Title: sudeeksha bhati us returned girl died road accident facing eve teasing bulandshahr

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.