कर्नाटकमधील पूरग्रस्तांसाठी सुधा मूर्ती यांनी दिली तब्बल 25 कोटींची मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 10:13 AM2018-10-10T10:13:51+5:302018-10-10T10:17:55+5:30
इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे.
बंगळुरू - भारतातील प्रमुख आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती या त्यांच्या साधेपणासाठी आणि दानशूरपणासाठी प्रसिद्ध आहेत. सुधा मूर्ती यांच्या दानशूरपणीची अशीच एक कहाणी समोर आली आहे. यंदाच्या पावसाळ्यात कर्नाटकमधील कोडागू भागात महापुरामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली होती. या परिसरातील मदत आणि पूनर्वसन कार्यासाठी सुधा मूर्ती यांनी तब्बल २५ कोटी रुपयांची मदत केली आहे.
दक्षिण भारतातील केरळला यावर्षी महापुराचा फटका बसला होता. त्यावेळी देशभरातून केरळसाठी मदतीचा ओघ सुरू झाला होता. त्याच दरम्यान कर्नाटकमधील कोडागूमध्ये महापुराने थैमान घातले होते. दरम्यान, येथील मतद आणि पुनर्वसनासाठी सरकारकडून आवाहन करण्यात आले होते. दरम्यान इन्फोसिसच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या सुधा मूर्ती यांनी येथील पुनर्वसनासाठी २५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
Karnataka: Infosys Foundation Chairperson Sudha Murthy announces Rs 25 Crore for the victims of Kodagu floods.
— ANI (@ANI) October 10, 2018