जकातीमुळे साखर निर्यात अव्यवहार्य

By admin | Published: June 18, 2016 01:35 AM2016-06-18T01:35:27+5:302016-06-18T01:35:27+5:30

दर नियंत्रणात ठेवण्यासाठी व देशात पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर २० टक्के जकात लावण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या साखर निर्यात अव्यावहारिक झाल्याचे

Sugar export is unavoidable due to the delay | जकातीमुळे साखर निर्यात अव्यवहार्य

जकातीमुळे साखर निर्यात अव्यवहार्य

Next

नवी दिल्ली : दर नियंत्रणात ठेवण्यासाठी व देशात पुरेसा साठा उपलब्ध व्हावा यासाठी साखरेच्या निर्यातीवर २० टक्के जकात लावण्यात आल्याने आर्थिकदृष्ट्या साखर निर्यात अव्यावहारिक झाल्याचे भारतीय साखर कारखान्यांची संघटना ‘भारतीय साखर कारखाना संघा’ने (इस्मा) म्हटले आहे.
साखरेचा दर ४० रुपये प्रतिकिलोवर गेला आहे. त्यामुळे दरनियंत्रणासाठी सरकारने गुरुवारी साखरेच्या निर्यातीवर २० टक्के जकात लावण्याचा निर्णय घेतला. जगभरात साखरेच्या किमती ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्याने निर्यात करून लाभ उठविण्याचे प्रयत्न चालू होते. सरकारच्या या निर्णयावर प्रतिक्रिया देणारे पत्रक ‘इस्मा’चे महासंचालक अविनाश वर्मा यांनी जारी केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

गहू आयातीवर कर कायम
आयातीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गव्हावर लावण्यात आलेली
२५ टक्के जकात यापुढेही
कायम ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. देशात दुष्काळी परिस्थिती असूनही गव्हाच्या उत्पादनात ९ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

Web Title: Sugar export is unavoidable due to the delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.