ऊस पिकासाठी ठिबक सिंचन न केल्यास साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही
By admin | Published: May 22, 2015 12:24 AM2015-05-22T00:24:58+5:302015-05-22T00:24:58+5:30
साखर आयुक्ताचे राज्यातील साखर कारखान्यांना इशारा
Next
स खर आयुक्ताचे राज्यातील साखर कारखान्यांना इशारापुणे: ठिबक सिंचन तंत्रज्ञान आधुनिक ऊस शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असून, पाण्याची पन्नास टक्के बचते होते. ठिबक सिंचन योजनेसाठी शासनाकडून शेतक-यांना दर वर्षी लाखो रुपयांचे आर्थिक सहाय्य केले जाते. परंतु अद्यापही राज्यात ठिबक सिंचनाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा वापर करण्याबाबत कार्यवाई न केल्यास यापुढे साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्यात येणार नसल्याचा इशारा साखर आयुक्त यांनी दिले आहेत.महाराष्ट्र देशात ऊस व साखर उत्पादनात अग्रेसर असले तरी गेल्या काही वर्षांत सातत्याने पडणारा दुष्काळ, पावसाची अनियमिता व अयोग्य सिंचन पध्दत यामुळे ऊस क्षेत्र व ऊस उत्पादनामध्ये शाश्वतता दिसत नाही. त्यात कारखान्यांच्या संख्येत होणारी वाढ यामुळे कारखान्यांना पुरेसा ऊस गाळपाकरीता उपलब्ध होण्याची शाश्वती नाही. त्यामुळे प्रति हेक्टर ऊस उत्पादकता आणि उपलब्ध असलेल्या पाण्याचा कार्यक्षमतेने वापर करणे काळाची गरज आहे. साखर कारखान्यांना कार्यक्षमतेने चालण्याकरीता जास्तीत जास्त ऊस उपलब्ध होण्यासाठी ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी उच्च तंत्रज्ञाचा वापर करण्याची आवश्यकता आहे. यामध्ये ठिबक सिंचन एक महत्वाचे तंत्र असून, यामुळे उत्पादकता वाढते, पाण्याचा कार्यक्षमतेने वापर, वीजेची व मजुरांची बचत, जमीन क्षारपड न होणे असे अनेक फायदे मिळतात. ठिबक सिंचनामुळे ऊस उत्पादनात प्रति हेक्टर १४८ ते २२७ टनापर्यंत वाढ होते. तसेच पाण्याची बचत होऊन रासायनिक खतांत ३० ते ५० टक्क्यापर्यंत बचत होते. तसेच आर्थिकदृष्या हे तंत्रज्ञान परवडणारे आहे. त्यामुळे ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सर्व साखर कारखान्यांनी शेतक-यांना यांचे महत्व पटवून द्यावे, ठिबक सिंचन खरेदी करण्यासाठी ऊस उत्पादक शेतक-यांना अनुदान व कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँक हमी देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.