भीमाप्यातील ऊस निघाला छावण्यांकडे शेतकरी हतबल : चोवीसशे रुपये टन दराने विकतो ऊस
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30
सिद्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा प्यातील शेतकर्यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.
Next
स द्धटेक : उसाच्या उत्पन्नावर भरवसा ठेवून मोठ्या कष्टाने जोपासलेल्या उसाची रवानगी अखेर चारा छावण्यांकडे करण्याची वेळ भीमा पट्ट्यातील शेतकर्यांवर आली आहे. अठराशे ते चोवीसशे रुपये टन असा भाव त्यासाठी मिळत आहे.उसाचे वाढे व पाचट यासहित उसाची छावणीसाठी विक्री होत असल्याने शेतकर्यांसाठी ते फायद्याचे ठरणारे आहे. दरम्यान, भामा-आसखेडच्या आवर्तनाचे पाणी अजूनही नदीपात्रात न आल्याने ऊस विकण्यासाठी शेतकर्यांची धडपड सुरू आहे.नदीपात्रातील मागील वर्षीचा पाणीसाठा फेब्रुवारी ते मार्चपर्यंत कसाबसा टिकला. त्यानंतर शेतकरी वर्गाची पिके वाचवण्यासाठी धडपड सुरू झाली. त्यातच भीमाकाठावरील वीज पुरवठ्यात कपात करुन दोन्ही बाजूंनी शेतकर्यांची कोंडी सुरू आहे़ भामा-आसखेड धरणातून नदीकाठावरील पशुधन व काठावरील गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडलेले आहे. ते पाणी अजूनही तालुका हद्दीत पोचलेले नाही. भीमाकाठावर दुष्काळाचे सावट असल्याने शेतकर्यांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, ऊस शेतीतील या परिस्थितीचा परिणाम साखर कारखानदारीवर होणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.फोटो ओळी : पाण्याअभावी आडसाली ऊस जळून जाण्याआधी तो चारा छावण्यांना विकण्यासाठी ट्रॅक्टरमधून पाठविला जात आहे़