खासदारांना 150 किमींची पदयात्रा करण्याची सूचना, पंतप्रधान मोदींचा नवा फंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:12 PM2019-07-09T15:12:12+5:302019-07-09T15:13:11+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अठरा अठरा तास काम करतात. तसेच, आपल्या सहकारी मंत्र्यांनाही नेहमीच कामात सक्रीय असण्याचे धडे देतात.

Suggestions for 150km walk to the MPs, Prime Minister Modi's new trics | खासदारांना 150 किमींची पदयात्रा करण्याची सूचना, पंतप्रधान मोदींचा नवा फंडा

खासदारांना 150 किमींची पदयात्रा करण्याची सूचना, पंतप्रधान मोदींचा नवा फंडा

Next

नवी दिल्ली - भाजपाच्या ससंदीय दलाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्तितीत आज नवी दिल्ली येथे पार पडली. या बैठकीला गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यासमेवत अनेक दिग्गज नेते हजर होते. या बैठकीत भाजपाच्या सर्व खासदारांना 2 ऑक्टोबर रोजी पदयात्रा काढण्याच्या सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या आहेत. विशेष म्हणजे 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून या पदयात्रेला सुरुवात होणार असून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीपर्यंत ही पदयात्रा चालणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: अठरा अठरा तास काम करतात. तसेच, आपल्या सहकारी मंत्र्यांनाही नेहमीच कामात सक्रीय असण्याचे धडे देतात. यापूर्वीही मोदींनी सर्व मंत्र्यांना सकाळी 9.30 वाजता कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर, आता मोदींनी भाजपाच्या सर्वच खासदारांना पदयात्रा काढण्याची सूचना केली आहे. दिल्लीतील भाजपच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदींनी ही सूचना केली. विशेष म्हणजे एकूण 150 किलो मीटरची ही पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेत खासदार, आमदार, भाजपा नेते आणि कार्यकर्ते हजर असतील. दररोज 15 किमी म्हणजेच 10 दिवसात 150 किमींची पदयात्रा असणार आहे. या पदयात्रेतून महात्मा गांधींच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक बुथवर वृक्षारोपणही करण्यात येणार आहे. लोकसभेसह राज्यसभेच्या खासदारांनाही ही पदयात्रा करण्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. याबाबत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी माहिती दिली. 


 

Web Title: Suggestions for 150km walk to the MPs, Prime Minister Modi's new trics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.