मोदींवर केला जाणार होता आत्मघाती हल्ला

By admin | Published: September 11, 2014 10:34 AM2014-09-11T10:34:17+5:302014-09-11T10:45:39+5:30

पाटणातील गांधी मैदान येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता असा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला आहे.

Suicidal attack will be done on Modi | मोदींवर केला जाणार होता आत्मघाती हल्ला

मोदींवर केला जाणार होता आत्मघाती हल्ला

Next

ऑनलाइन लोकमत

पाटणा, दि. ११ -  गेल्या वर्षी लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पाटणातील गांधी मैदान येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याचा कट दहशतवाद्यांनी रचला होता असा धक्कादायक खुलासा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. २००२ गुजरात दंगलींचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला जाणार होता व यासाठी दहशतवाद्यांनी स्फोटकांचा वापर करुन जॅकेटही तयार केले होते असे एनआयएने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. 
सप्टेंबर २०१३ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील गांधी मैदानात सभा होती. या सभेपूर्वी मैदान व सभोवतालच्या परिसरात साखळी स्फोट घडवण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास करणा-या एनआयने पाटणातील कोर्टात ३६ पानी आरोपपत्र दाखल केले आहे. यात एनआयएने एक दहशतवादी माफीचा साक्षीदार बनल्याचे स्पष्ट केले. या दहशतवाद्याने मोदींवर आत्मघाती हल्ला करण्याचा कट होता अशी कबूली दिली आहे असे आरोपपत्रात म्हटले आहे.स्फोटाचा सूत्रधार हैदर अली व त्याच्या साथीदारांनी स्फोटक भरलेले जॅकेटही तयार केले होते व रिमोट कंट्रोलद्वारे हे स्फोट घडवले जाणार होते. याची चाचपणी रांची येथील  एका झाडावर घेण्यात आली होती व याचे छायाचित्रही उपलब्ध असल्याने एनआयएने म्हटले आहे. 
पाटणातील रॅलीपूर्वी हैदरने माफीचा साक्षीदार झालेल्या दहशतवाद्याशी संपर्क साधून त्याला आत्मघाती हल्ला करण्यासाठी तयार केले. मात्र नरेंद्र मोदींना दिलेली सुरक्षा पाहता हा हल्ला करणे अशक्य होते व त्यामुळे आयत्यावेळी या हल्ल्यातून माघार घेतल्याने या साक्षीदाराने तपास यंत्रणांना सांगितले. 

Web Title: Suicidal attack will be done on Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.