संसदेजवळ इसमाची आत्महत्या

By Admin | Published: May 13, 2016 04:21 AM2016-05-13T04:21:57+5:302016-05-13T04:21:57+5:30

गुरुवारी सकाळी संसद भवन परिसरातील झाडावर फास लावून एका ३९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. मृताचे नाव रामदयाल वर्मा असून ते मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

Suicide Against Parliament | संसदेजवळ इसमाची आत्महत्या

संसदेजवळ इसमाची आत्महत्या

googlenewsNext

नवी दिल्ली : गुरुवारी सकाळी संसद भवन परिसरातील झाडावर फास लावून एका ३९ वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. मृताचे नाव रामदयाल वर्मा असून ते मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत. उत्तर दिल्लीच्या कोतवाली परिसरात ते भाड्याच्या घरात राहात होते.
संसद मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या खिशातून आत्महत्येपूर्वी लिहिलेले पत्र सापडले आहे. सकाळी ७.१५ वाजताच्या सुमारास रेल्वेभवन आणि विजय चौकादरम्यान मीडिया पार्किंग सेंटरजवळील एका झाडावर वर्मा यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
घटनास्थळ संसद भवनाच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरणी गंभीरपणे घेत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या २३ पानी पत्रात वर्मा यांनी आपण प्रचंड आर्थिक संकटात असून आयपीएल सामन्यादरम्यान लावलेल्या सट्ट्यात फार मोठे नुकसान सहन करावे लागले असल्याचे म्हटले आहे.
बुकींचे कोट्यवधी रुपये आपल्याला फेडायचे असल्याचे वर्मांनी पत्रात लिहिले असून, त्याचे हिशेबच त्यांनी दिला आहे. या पत्रातील माहितीची शहानिशा करण्यात येत असल्याचे नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त जतीन अग्रवाल यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)

Web Title: Suicide Against Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.