Suicide Attempt: सुप्रीम कोर्टाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 16:08 IST2022-01-21T16:08:27+5:302022-01-21T16:08:46+5:30
Suicide Attempt: सुप्रीम कोर्टाच्या गेट नंबर-1 बाहेर नोएडाचे रहिवासी असलेल्या राजभर गुप्ता यांनी आत्महदनाचा प्रयत्न केला आहे.

Suicide Attempt: सुप्रीम कोर्टाबाहेर एका व्यक्तीचा आत्मदहनाचा प्रयत्न, प्रकृती गंभीर
नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयासमोर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली आहे. अंगावर रॉकेल ओतून व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतले. पण, तिथे उपस्थित लोकांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ त्या व्यक्तीला लागलेली आग विझविली आणि त्याचा जीव वाचला. सध्या जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजभर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेट क्रमांक 1 जवळ पोहोचून अचानक रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. राजभर यांनी स्वत:ला पेटवून घेताच परिसरात खळबळ उडाली. आगीचे लोळ पाहून काही लोक घाबरले. त्याचवेळी गेटवर तैनात असलेले सुरक्षा कर्मचारी आणि तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी तातडीने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येईपर्यंत राजभर मोठ्या प्रमाणात जळाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला
पीडित व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. राजभर गुप्ता असे आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. तो नोएडा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याने आत्मदहनाचा प्रयत्न का केला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी राजभर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीस आता राजभरच्या कुटुंबीयांचीही चौकशी करत आहेत.