तरुणाची गळफास लावून आत्महत्या भावसार मढीतील घटना : दरवाजा तोडून काढला मृतदेह बाहेर
By admin | Published: March 18, 2016 10:25 PM2016-03-18T22:25:50+5:302016-03-18T22:25:50+5:30
जळगाव: भावसार मढीत राहणार्या भूषण सुभाष बारी (वय ३४) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
Next
ज गाव: भावसार मढीत राहणार्या भूषण सुभाष बारी (वय ३४) या तरुणाने शुक्रवारी दुपारी राहत्या घरी वरच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दरवाजा तोडून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याबाबत शनी पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.शुक्रवारी दुपारी दोन वाजता भूषण हा नेहमी प्रमाणे वरच्या मजल्यावर झोपायला गेला होता.यावेळी आई बाहेर तर वडील कामावर गेले होते.संध्याकाळी साडे पाच वाजले तरी मुलगा उठला नाही, म्हणून आई राधाबाई या त्याला उठविण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्या असता दरवाजा आतून बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले तर पत्र्याच्या लोखंडी पाईला दोरी बांधून त्याने गळफास घेतल्याचे दिसले.पत्र्याच्या छताची उंची कमी असल्याने गुडघ्यापासून पाय वाकवून त्याने आत्महत्या केली आहे.इन्फोआईने मारली किंकाळीमुलगा भूषण याने आत्महत्या केल्याचे लक्षात आल्यानंतर आईने जोरात किंकाळी मारली. त्यांच्या या आवाजामुळे गल्लीतील तरुण धावत गेले. राधाबाई यांना सावरत त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना कळविली. पोलीस येईपर्यंत सुन्न अवस्थेत त्या मुलाच्या प्रेताजवळ बसून होत्या. तरुणांनी त्यांना जबरदस्तीने खाली आणले. तेथे त्यांचा होणारा प्रचंड आक्रोश उपस्थितांचा मन हेलावणारा होता.दोन बहिणींचा एकुलता भाऊभूषण हा दोन बहिणींचा एकुलता एक मोठा भाऊ होता. दोघी बहिणी विवाहित असून अश्विनी हिला शिरसोली तर सपनाला अंतुर्ली ता.मुक्ताईनगर येथे दिले आहे. वडील टेक्सटाईलच्या दुकानावर कामाला आहेत तर आई गृहिणी आहे. भूषण स्वत: सीसीटीव्ही व क्वॉईन बॉक्स फोन दुरुस्तीचे काम करायचा. सकाळी वडील कामावर जाताना त्यांच्याशी तो चांगला बोललाही होता.इन्फोगुरुवारी लग्नासाठी पाहिली होती मुलगी यंदा त्याचा विवाह करायाचा निर्णय कुटुंबाने घेतला होता.त्यासाठी लग्नाचे स्थळ पाहण्याचे सुरू होते. गुरुवारी तो एका ठिकाणी मुलगी पाहून आला होता,असे असतानाच त्याने अचानक आत्महत्या केल्यामुळे बारी कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.मृतदेहाजवळ होती बाहुलीभूषणचा मृतदेह खाली उतरवला असता गादीजवळ सजवलेली बाहुली होती. त्यावर गोधडी टाकली होती.तर मोबाईल एअरमोडवर ठेवला होता. सकाळी ६.३५ वाजता त्याला एक फोन आला होता. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला.