मित्राचा मृत्यू झाला म्हणून केली आत्महत्या
By admin | Published: September 28, 2016 08:27 PM2016-09-28T20:27:54+5:302016-09-28T20:27:54+5:30
लहानपणीच्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला अपघाती मृत्यू सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना
Next
>ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 28 - लहानपणीच्या मित्राचा डोळ्यासमोर झालेला अपघाती मृत्यू सहन न झाल्याने एकाने आत्महत्या केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. के. रमेश असं आत्महत्या केलेल्या तरूणाचं नाव असून जी. हरिकृष्णा असं अपघाती मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. दोघेही कुकटपल्ली येथे एकाच वसतीगृहात रहात होते आणि दोघांचे शिक्षणही एकत्र झाले होते.
आंध्र प्रदेशमधील गुंतूर जिल्ह्यातील दोघे रहिवासी होते. अभियंता असलेला जी. हरिकृष्णा व के. रमेश हे मोटारसायकलवरून प्रवास करत असताना ट्रकने त्यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये जी. हरिकृष्णाचा जागीच मृत्यू झाला. हरिकृष्णाच्या मृत्यूचा के. रमेशला जबर धक्का बसला होता. हरिकृष्णा हा काही दिवसांपूर्वीच मलेशियाहून आला होता. मित्राच्या मृत्यूच्या धक्क्यातून रमेश सावरू शकला नाही आणि त्याने येथील भारत नगरजवळील रेल्वे ट्रॅकवर जाऊन धावत्या रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली.