30 बलात्कार, 15 हत्या करणाऱ्या ‘सायको शंकर’ची तुरुंगात आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:17 AM2018-03-01T01:17:18+5:302018-03-01T01:17:18+5:30
विकृत मनोवृत्तीचा ‘क्रूरकर्मा’ एम. जयशंकरच्या दहशतीचा अंत झाला असून, त्याने दाढीच्या तुटक्या ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन येथील तुरुंगात आत्महत्या केली.
सेलम : विकृत मनोवृत्तीचा ‘क्रूरकर्मा’ एम. जयशंकरच्या दहशतीचा अंत झाला असून, त्याने दाढीच्या तुटक्या ब्लेडने स्वत:चा गळा चिरुन येथील तुरुंगात आत्महत्या केली. तामिळनाडू व कर्नाटकात ३० बलात्कार आणि १५ खूनाच्या गुन्ह्यांसाठी तो शिक्षा भोगत होता. मंगळवारी मध्यरात्रीनंतर तो इतर कैद्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्यावर २०१७ मध्ये ‘सायको शंकर’ नावाने कन्नड चित्रपटही बनिवण्यात आला होता.
त्याला रक्तबंबाळ स्थितीत पाहून कैद्यांनी तुरुंग अधिकाºयांना कळवले. डॉक्टरने सरकारी इस्पितळात नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर जयशंकरला बंगळुरातील व्हिक्टोरिया इस्पितळात हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी सकाळी ५.१० वाजता त्याला मृत घोषित केले. शिक्षा भोगतानाही तो दोनदा तुरुंगाची भिंत चढून पळाला होता. त्याला पुन्हा ५ सप्टेंबर २०१३ रोजी अटक करण्यात आली होती.
सायको शंकरच्या मृत्यूच्या चौकशीचे तुरुंग प्रशासानेआदेश दिले आहेत. जयशंकरने न्हाव्याकडचे ब्लेड चोरून शर्टात दडविले होते. तो कळा कापून घेत असताना, त्याला एकानेही पाहिले नाही, असे तुरुंग अधिका-यांनी पोलिसांना सांगितले.
कोण होता जयशंकर? - जयशंकर (४१) मूूळचा सेलम जिल्ह्यातील कन्नियामपट्टीचा. आठवीनंतर तो ट्रक ड्रायव्हर बनला. हे काम करताना तो कन्नड व हिंदी भाषा शिकला. त्याने २३ आॅगस्ट २००९ रोजी महिला कॉन्स्टेबलचा बलात्कारानंतर खून केला होता. पोालिसांनी त्याचा माग काढत पकडून १९ आॅक्टोबर २००९ रोजी कोईम्बतूर तुंरुगात डांबले होते. चौकशीत त्याने अनेक बलात्कार व हत्या केल्याचे आढळून आले. त्या आधी न्यायालयातून तुरुंगात नेत असताना, तो पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता. बेल्लारीत ६ महिलांवर बलात्कार करून त्यांचा खून केला होता.