वैद्यकिय अधिकार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

By admin | Published: November 20, 2015 11:54 PM2015-11-20T23:54:37+5:302015-11-20T23:54:37+5:30

जळगाव: वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळनेर उपकेंद्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (मुळ.रा.म्हसास ता.पाचोरा) यांनी गुरुवारी मध्यरात्री जळगावातील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, डॉ.पाटील यांचा स्थानिक कर्मचारी व काही पुढार्‍यांकडून छळ होत होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. त्या दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.

Suicide by taking a medical officer's rape | वैद्यकिय अधिकार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

वैद्यकिय अधिकार्‍याची गळफास घेवून आत्महत्या

Next
गाव: वरणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत पिंपळनेर उपकेंद्रात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ.दिनेश अमृत पाटील (मुळ.रा.म्हसास ता.पाचोरा) यांनी गुरुवारी मध्यरात्री जळगावातील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान, डॉ.पाटील यांचा स्थानिक कर्मचारी व काही पुढार्‍यांकडून छळ होत होता, त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली. त्या दोषींवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला.
डॉ.पाटील व त्यांची पत्नी डॉ.पुजा हे दोघं जण रिंग रोडवरील हरेश्वर नगरातील वृंदावन अपार्टमेंटमध्ये २० क्रमांकाच्या खोलीत भाड्याने वास्तव्याला होते. पत्नी या दिवाळीनिमित्त नाशिक येथे माहेरी गेल्या होत्या. पिंपळनेर येथे ड्युटी असल्याने ते जळगावहून ये-जा करीत होते. गुरुवारी ते ड्युटी आटोपून संध्याकाळी सहा वाजता घरी आले. रात्री जेवण झाल्यानंतर त्यांनी बारा वाजेच्या सुमारास घरातच गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मेहुणे ईश्वर पवार यांनी जिल्हा पेठ पोलिसांना ही माहिती कळविली. सकाळी उपनिरीक्षक गिरधर निकम यांनी मृतदेह व घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.
खोट्या स‘ांच्या प्रकरणात नाव गुंतवले
गेल्या काही दिवसापुर्वी आरोग्य केंद्राचे लिपिक अविनाश पाटील याने प्रोसेडींगमध्ये जि.प.सदस्य संजय पाटील यांच्या डुप्लीकेट स‘ा करुन आर्थिक घोळ केला. हा प्रकार पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर अविनाश पाटील यांनी त्या स‘ा डॉ.दिनेश पाटील यांनी केल्याचे खोटे सांगितले. दरम्यान,या प्रकरणात त्यांना पैशांसाठी काही लोकांकडून ब्लॅकमेल केले जात होते, असा आरोप डॉ.पाटील यांचे भुसावळचे मेहुणे ईश्वर पवार यांनी केला. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी वरणगावच्या नगरसेवकाच्या मध्यस्थीने ६० हजार रुपये देवून तंटा मिटविला होता. परंतु तरीही लिपीक, वाहन चालक व काही पुढार्‍यांकडून त्यांचा छळ सुरुच होता.

शवविच्छेदनाला उशिर
डॉ.दिनेश पाटील यांचा छळ करणार्‍यांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने पोलिसांचीही अडचण झाली होती. त्यामुळे शवविच्छेदनालाही उशिर झाला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनलाही बराच वेळ गोंधळ चालला. संध्याकाळी उशिरापर्यंत अकस्मात मृत्यूचीच नोंद करण्यात आली होती.

Web Title: Suicide by taking a medical officer's rape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.