न्यायाधीशाची रेल्वेखाली आत्महत्या
By admin | Published: March 7, 2016 03:57 AM2016-03-07T03:57:36+5:302016-03-07T03:57:36+5:30
यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी मांजरखेड येथील रेल्वे क्राँसिंगवर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली
यवतमाळमधील घटना : दारव्हात नुुकतीच बदली
चांदूररेल्वे : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील वरिष्ठ स्तर न्यायाधीश अनुप दिगंबर जावळकर यांनी मांजरखेड येथील रेल्वे क्राँसिंगवर रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झाले नसून यामुळे विधिक्षेत्रात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)वर्धा येथील मूळ रहिवासी अनुप जावळकर यांची काही दिवसांपूर्वीच यवतमाळ येथून दारव्हा येथे बदली झाली होती. परंतु त्यांचे कुटुंब यवतमाळ येथेच वास्तव्यास होेते.
एका लग्नसमारंभात सहभागी होण्याकरिता शनिवारी ते यवतमाळला गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते गाडी घेऊन घरातून बाहेर पडले होते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
त्यांनी भ्रमणध्वनीदेखील घरीच ठेवला होता. मांजरखेडनजीक रेल्वे रुळावर एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची माहिती एका ग्रामस्थाने रविवारी पहाटे चांदूररेल्वे पोलीस ठाण्याला दिली.