इंग्रजी येत नाही म्हणून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

By Admin | Published: July 28, 2016 01:09 PM2016-07-28T13:09:56+5:302016-07-28T13:13:51+5:30

इंग्लिश भाषेशी जुळवून घेणे कठीण जात असल्याने महापालिका शाळेत शिक्षण घेणा-या एका १६ वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली.

Suicides committed by a girl student so as not to come in English | इंग्रजी येत नाही म्हणून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

इंग्रजी येत नाही म्हणून विद्यार्थिनीने केली आत्महत्या

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

तिरुवनामलाई, दि. २८ - इंग्लिश भाषेशी जुळवून घेणे कठीण जात असल्याने महापालिका शाळेत शिक्षण घेणा-या एका १६ वर्षाच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली. इंग्लिश विषयातील खराब कामगिरीमुळे निराश होऊन या मुलीने स्वत:ला जाळून घेतले. 
 
केरळमधील तिरुवनामलाई जिल्ह्यातील कीलनाथूर येथे ही घटना घडली. भवानी असे या मुलीचे नाव असून ती दहाव्या इयत्तेत होती. सोमवारी सकाळी भवानीचे आई-वडील नोकरीसाठी घराबाहेर पडल्यानंतर तिने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. तिने अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेतले. 
 
भवानीला इंग्लिश विषयाशी जुळवून घेणे कठीण जात होते. तिला इंग्लिशमध्ये परिक्षेतही कमी मार्कस मिळाले होते. याबद्दल ती तिच्या भावंडांबरोबर बोलली होती. इंग्रजीमुळे तिची शाळेत जाण्याची इच्छाही संपली होती असे भवानीच्या आई-वडीलांनी सांगितले. 
 

Web Title: Suicides committed by a girl student so as not to come in English

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.