'वन रँक, वन पेन्शन'ची मागणी पूर्ण न झाल्याने निवृत्त सैनिकाची आत्महत्या
By admin | Published: November 2, 2016 10:36 AM2016-11-02T10:36:42+5:302016-11-02T14:18:59+5:30
वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिक सुबेदार राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
भिवानी (हरियाणा), दि. 2 - वन रँक वन पेन्शनच्या मुद्यावर निवृत्त सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुबेदार राम किशन गरेवाल असं त्यांचं नाव असून भिवानी जिल्ह्यातील बुमला गावात ते राहत होते. आपल्या राहत्या घरी विष प्राशन करुन त्यांनी आत्महत्या केली आहे.
राम किशन गरेवाल यांना वन रँक वन पेन्शनसंबंधी तक्रार करायची होती. त्यासाठी त्यांना केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घ्यायची होती. मात्र त्यांची भेट घेण्यास नकार देण्यात आल्याने राम किशन गरेवाल यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असल्याचं कळत आहे.
राम किशन गरेवाल यांनी दिल्लीतील जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता. 'त्यांनी आम्हाला फोन केला होता. वन रँक वन पेन्शनसंबंधी आमच्या मागण्या सरकार पुर्ण करु शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सांगितलं', अशी माहिती त्यांच्या मुलाने दिली आहे.
He called us & informed he is committing suicide as the Govt has failed to fulfil their demands related to OROP: Son of Ram Kishan Garehwal pic.twitter.com/37WwsnBOao
— ANI (@ANI_news) November 2, 2016
मोदींच्या राज्यात शेतकरी आणि जवान दोन्ही आत्महत्या करत आहेत अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
मोदी राज में किसान और जवान दोनो आत्महत्या कर रहे हैं। https://t.co/9f5zJDxlZg
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 2, 2016