Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 12:54 PM2024-09-21T12:54:14+5:302024-09-21T13:01:03+5:30
Sukesh Chandrasekhar And Jacquline Fernandez : महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. प
तिहार जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा एकदा पत्र लिहिलं आहे. पत्रामध्ये सुकेशने जॅकलिनला बेबी गर्ल म्हणत किरण रावच्या लापता लेडीजमधील 'सजनी' हे गाणं डेडिकेट केलं आहे. सुकेश २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात जेलमध्ये आहे. याच प्रकरणात ईडीने जॅकलिनचीही चौकशी केली आहे.
आपल्या नवीन पत्रात सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिचा नवीन फोटो सुंदर असल्याचं सांगितलं. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं असं म्हटलं आहे. सजनी हे लापता लेडीजमधील गाणं डेडिकेट करत त्यातील प्रत्येक ओळ अभिनेत्रीबद्दल त्याच्या असलेल्या भावना व्यक्त करत असल्याचं म्हटलं आहे. तसेच जॅकलिनला न पाहता आणि न भेटल्याशिवाय दिवस-रात्र घालवणं त्याच्यासाठी खूप कठीण होत असल्याचंही सुकेशने सांगितलं.
सुकेशने पत्रात जॅकलिनच्या फोटोचाही उल्लेख केला आहे. जॅकलिन याची स्तुती करेल अशी आशा सुकेशने व्यक्त केली. दोघांचं हृदय एकमेकांसाठी धडकतं असंही म्हटलं. सुकेशने पुन्हा एकदा जॅकलिनला आपल्या प्रेमाबद्दल विश्वास देत आपला बॉण्ड हा रोमिओ आणि ज्युलिएटच्या कथेसारखा असल्याचं सांगितलं. तसेच प्रेमात कोणतेही अडथळे नसल्याचं म्हटलं आहे.
सुकेशने जॅकलिनची साथ कधीही सोडणार नाही असं वचन देत दोघे पुन्हा एकत्र येतील अशी आशा व्यक्त केली. सोशल मीडियावर सुकेश आणि जॅकलिनचे काही फोटो लीक झाले होते. सुकेशने जॅकलिनला कोट्यवधी रुपयांच्या भेटवस्तूही दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडी सुकेश आणि जॅकलिनची चौकशी करत आहे. जॅकलीनने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.