Sukesh Chandrasekhar : "७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 10:48 IST2025-01-12T10:47:33+5:302025-01-12T10:48:42+5:30

Sukesh Chandrasekhar And Nirmala Sitharaman : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली.

Sukesh Chandrasekhar letter to Nirmala Sitharaman offers to pay 7640 crore tax | Sukesh Chandrasekhar : "७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र

Sukesh Chandrasekhar : "७६४० कोटी देईन..."; जॅकलीनला लव्हलेटर लिहिणाऱ्या सुकेशने सीतारामन यांना लिहिलं पत्र

कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात बराच काळ जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरने आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र लिहून त्याच्या परदेशातील उत्पन्नाची माहिती दिली आहे. सुकेशने २०२४-२५ च्या भारत सरकारच्या योजनेच्या नियमांनुसार आपलं उत्पन्न जाहीर करण्याबाबत आणि कर भरण्याबाबत म्हटलं आहे. सुकेशवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहे. अंमलबजावणी संचालनालय त्याच्याविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. याच दरम्यान त्याने हे पाऊल उचललं आहे.

सुकेशने पत्रात म्हटलं की, त्याच्या परदेशी कंपन्या, एलएस होल्डिंग्ज इंटरनॅशनल (नेवाडा, यूएसए मध्ये नोंदणीकृत) आणि स्पीड गेमिंग कॉर्पोरेशन (ब्रिटिश व्हर्जिन आयलंडमध्ये नोंदणीकृत), ऑनलाइन/ऑफलाइन गेमिंग आणि बेटिंग व्यवसाय करतात. हे व्यवसाय २०१६ पासून कार्यरत आहेत आणि २०२४ मध्ये त्यांची एकूण उलाढाल २.७ अब्ज डॉलर (अंदाजे ₹२२,००० कोटी) झाली आहे.

७६४० कोटींचा कर भरण्यास तयार

सुकेशने असंही सांगितलं की, त्याच्या कंपन्या अमेरिका, स्पेन, यूके, दुबई आणि हाँगकाँगमध्ये कार्यरत आहेत. भारतातील प्रलंबित कर वसूलीची प्रकरणे आणि अपीलांचे निराकरण करण्याची तयारी दर्शवत, त्याने  ७,६४० कोटी कर भरण्याबाबत म्हटलं आहे. भारतातील तंत्रज्ञान आणि प्रगत ऑनलाइन कौशल्य गेमिंग क्षेत्रात निधी गुंतवण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.

फसवणूक आणि मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

सुकेशवर कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या अनेक प्रकरणांमध्ये आरोप असल्याची माहिती आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) त्याच्याविरुद्ध २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी करत आहे. हे प्रकरण रॅनबॅक्सीचे माजी प्रवर्तक शिविंदर आणि मालविंदर सिंग यांच्या पत्नींकडून २०० कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे.

जॅकलिन फर्नांडिसशी संबंधित वादही चर्चेत 

सुकेशचं नाव बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतही जोडलं गेलं आहे. जॅकलिनने प्रेमसंबंध नसल्याचं म्हटलं आहे. ईडीने तिची अनेक वेळा चौकशी केली आहे. सध्या सुकेशच्या या पत्रानंतर त्याचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. आता सरकार यावर काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुकेश जेलमधून जॅकलीनला नेहमीच लव्हलेटर लिहित असतो. 
 

Web Title: Sukesh Chandrasekhar letter to Nirmala Sitharaman offers to pay 7640 crore tax

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.