Sukesh Chandrasekhar : "कैद्यांच्या कल्याणासाठी मी 5.11 कोटींचं योगदान देऊ इच्छितो"; जेलमधून महाठग सुकेशचं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:17 AM2023-03-26T10:17:04+5:302023-03-26T10:22:05+5:30

Sukesh Chandrasekhar : महाठग सुकेश चंद्रशेखर याने बुधवारी कारागृह महासंचालकांना पत्र लिहिलं आहे.

Sukesh Chandrasekhar want to contribute five crore 11 lakh rupees for prisoners welfare | Sukesh Chandrasekhar : "कैद्यांच्या कल्याणासाठी मी 5.11 कोटींचं योगदान देऊ इच्छितो"; जेलमधून महाठग सुकेशचं पत्र

Sukesh Chandrasekhar : "कैद्यांच्या कल्याणासाठी मी 5.11 कोटींचं योगदान देऊ इच्छितो"; जेलमधून महाठग सुकेशचं पत्र

googlenewsNext

तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखर याने बुधवारी कारागृह महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. पत्रात त्याने कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी 5.11 कोटी रुपयांचे योगदान देण्याची परवानगी मागितली आहे. हे पैसे अशा लोकांना मदत करण्यासाठी आहेत जे त्यांचा जामीन करण्यास सक्षम नाहीत आणि अनेक वर्षांपासून तुरुंगात आहेत. सुकेशने पत्रात "चांगल्या हेतूने, कैद्यांच्या कल्याणासाठी 5.11 कोटी रुपयांचा डिमांड ड्राफ्ट स्वीकारावा अशी नम्र विनंती करतो. मला खूप आनंद होईल. 25 मार्च रोजी हे योगदान स्वीकारले तर माझ्या वाढदिवसाची ही सर्वोत्तम भेट ठरेल" असं लिहिलं आहे.  

HTच्या रिपोर्टनुसार, सुकेशने पत्रात लिहिलं आहे की, "गेल्या काही वर्षांत मी अनेक कुटुंबे तुटताना आणि आत्महत्या करतानाही पाहिले आहेत. कारण त्यांचे प्रियजन अनेक वर्षांपासून तुरुंगात आहेत. म्हणून मला हा छोटासा उपक्रम करायचा आहे आणि माझ्या वैयक्तिक कमाईच्या निधीतून हा छोटासा भाग द्यायचा आहे. आता आवश्यकतेनुसार जर माझे योगदान तुमच्या कार्यालयाने स्वीकारले असेल, तर माझी कायदेशीर टीम सर्व कायदेशीर बाबी स्त्रोताच्या पुराव्यासह देईल, कारण निधी माझ्यामार्फत पूर्णपणे 100% दिला जात आहे. ही माझी कमाई आहे, यात गुन्ह्याचा पैसा नाही."

"मी आणि माझे कुटुंबीय माझ्या धर्मादाय ट्रस्ट शारदा अम्मा फाऊंडेशन आणि चंद्रशेखर कॅन्सर फाउंडेशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या अनेक कल्याणकारी कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो आहोत, जे दक्षिण भारतातील लाखो गरिबांना अन्न पुरवतात आणि ते दर महिन्याला मोफत केमोथेरपी देखील देतात. कैद्यांची जामीन भरण्याची क्षमता नाही आणि ते खूप दिवस कारागृहात असल्यामुळे ते त्यांच्या कुटुंबियांना पैसेही देऊ शकत नाहीत किंवा पाठवू शकत नाहीत हे पाहून मला खूप वाईट वाटते. माझे भाऊ दिल्लीतील वेगवेगळ्या तुरुंगात आहेत. काही आठवड्यांपूर्वी, मी तुरुंग अधीक्षकांना एक विनंती पाठवली होती, ज्याला मला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही" असंही पत्रात म्हटलं आहे. 

"My Baby, मी खूप मिस करतोय..."; वाढदिवशी सुकेशने जेलमधून जॅकलिनला लिहिलं 'लव्ह लेटर'

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला वाढदिवसानिमित्त एक पत्र लिहिलं आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला लिहिलेल्या पत्रात "माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा, वाढदिवसाच्या या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे" म्हटलं आहे. सुकेशने पुढे लिहिलं की, "माझ्या आजुबाजुला तुझ्या एनर्जीची मला कमतरता भासते. माझ्याकडे शब्द नाहीत, परंतु मला माहीत आहे की तुझं माझ्यावरचं प्रेम कधीही संपणार नाही. तुझ्या सुंदर हृदयात काय आहे ते मला माहीत आहे. मला पुराव्याची गरज नाही आणि माझ्यासाठी एवढेच महत्त्वाचे आहे. बेबी, मी कबूल केलंच पाहिजे, मला तुझी आठवण येते, तुला माहीत आहे की मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तू आणि तुझे प्रेम ही माझ्या आयुष्यातील अमूल्य भेट आहे, तुला माहीत आहे की मी तुझ्या पाठीशी उभा आहे. लव्ह यू माय बेबी, मला तुझे हृदय दिल्याबद्दल धन्यवाद. वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी मी माझ्या सर्व समर्थकांचे आणि मित्रांचे आभार मानतो. मला शेकडो पत्रे मिळाली आहेत. मला खूप धन्य वाटत आहे. धन्यवाद" असं देखी सुकेशने आपल्या लव्ह लेटरमध्ये म्हटलं आहे.

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 


 

Web Title: Sukesh Chandrasekhar want to contribute five crore 11 lakh rupees for prisoners welfare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jailतुरुंग