Sukesh Chandrashekhar : "बेबी, तुझ्यासारखं सुंदर या ग्रहावर दुसरं कोणीच नाही"; जेलमधून सुकेशचं जॅकलिनला 'लव्ह लेटर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2023 12:35 PM2023-04-09T12:35:14+5:302023-04-09T12:47:57+5:30
Sukesh Chandrasekhar And Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला पत्र लिहून ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
तिहार जेलमध्ये असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrashekhar) आणखी एक पत्र आता समोर आले आहे. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिन फर्नांडिसला ( Jacqueline Fernandez) पत्र लिहून ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. या पत्रात सुकेशने "माय बेबी, माय बोम्मा, जॅकलिन, बेबी, मी तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा देतो! हा तुझ्या आवडत्या सणांपैकी एक सण आहे आणि तुला खूप खूप प्रेम" असं म्हटलं आहे. सध्या या पत्राची जोरदार चर्चा रंगली आहे.
सुकेशने तुरुंगातून एक पत्र लिहिले आहे त्यामध्ये, "बेबी, मी तुला ईस्टरच्या खूप खूप शुभेच्छा देतो! हा तुझ्या वर्षातील सर्वात आवडत्या सणांपैकी एक आहे. मला तुझी आठवण येते. मी तुझ्यातला तो बालिशपणा खूप मिस करत आहे. कशी तू अंडी फोडतेस आणि आतून कँडीज बाहेर काढतेस. बेबी, तू किती सुंदर आहेस याची तुला कल्पना आहे का? तुझ्यासारखे सुंदर या ग्रहावर दुसरं कोणीच नाही. माय बनी रॅबिट, मी तुझ्यावर प्रेम करतो" असं म्हटलं आहे.
"बेबी ही फेज संपणार आहे आणि आता ते चांगले होईल हे प्रत्येकजण पाहणार आहे. बेबी असा एकही क्षण नाही जेव्हा मी तुझ्याबद्दल विचार करत नाही आणि मला माहीत आहे की तुझ्या बाबतीतही असेच आहे. माय हनी बी तुझ्या सर्वात सुंदर हृदयात काय आहे हे मला माहीत आहे. मी वचन देतो की पुढचा ईस्टर तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम ईस्टर असेल. बेबी काल मी आपल्याबद्दल विचार करत होतो जेव्हा मी लक्स कोझीची तुझी नवीन जाहिरात पाहिली. ही जाहिरात निव्वळ योगायोग आहे, पण तू खूप सुंदर आहेस बेबी" असंही सांगितलं.
'तू माझ्या हृदयाची धडधड आहेस'
सुकेश चंद्रशेखरने यापुढे एका गाण्याच्या ओळींचा उल्लेख केला. सुकेशने , 'तुम मिले, दिल खिले और जीने को क्या चाहिए' लिहिले आहे. पुढे सुकेश म्हणाला, "बेबी तू माझ्या हृदयाची धडधड आहेस. माझ्यावर खूप प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. बेबी, आई, वडील आणि कुटुंबाला पुन्हा एकदा ईस्टरच्या शुभेच्छा. देव आशीर्वाद देवो! बेबी माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझा जॅकी बोम्मा."
वाढदिवसाला लिहिलं होतं पत्र
विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पत्र लिहिलं होतं. सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला लिहिलेल्या पत्रात म्हटले होते - "माय बेबी जॅकलीन, माय बोम्मा, आज माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी तुला खूप मिस करत आहे." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"