सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 04:46 AM2019-03-06T04:46:44+5:302019-03-06T04:47:01+5:30

पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यासाठी वापरलेल्या ‘स्पाईस-२०००’ बॉम्बनी एसयू-३० एमकेआय (सुखोई) लढाऊ विमानांचा ताफाही सुसज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले

Sukhoi fighter aircraft will be equipped with 'Spice' bombs | सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज

सुखोई लढाऊ विमान होणार ‘स्पाईस’ बॉम्बने सुसज्ज

googlenewsNext

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी प्रशिक्षण तळ नष्ट करण्यासाठी वापरलेल्या ‘स्पाईस-२०००’ बॉम्बनी एसयू-३० एमकेआय (सुखोई) लढाऊ विमानांचा ताफाही सुसज्ज करण्याचे काम हाती घेण्यात आले असून ते पूर्ण झाल्यावर भारतीय हवाईदलाच्या मारकशक्तीस दुप्पट बळकटी येईल.
इस्राएलकडून घेतलेले लक्ष्याचा अचूक वेध घेणारे ‘स्पाईस-२०००’ बॉम्ब सध्या हवाईदलातील फक्त मिराज विमानांवर बसविण्यात आलेले आहे. बालाकोट हल्ल्यातही मिराज विमानानेच हे बॉम्ब तेथे टाकले होते. परंतु आता सुखोई विमानांवरही हे बॉम्ब बसविण्यात येतील. सूत्रांनुसार भारताने इस्राएलकडून ‘स्पाइस-२०००’ प्रकारचे २०० बॉम्ब खरेदी केले आहेत. हा बॉम्ब सुखोई विमानावर बसवून जमिनीवरील लक्ष्याचा वेध घेण्याच्या काही चाचण्या अलिकडेच घेण्यात आल्या.

Web Title: Sukhoi fighter aircraft will be equipped with 'Spice' bombs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.