सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही - राजनाथ सिंह

By admin | Published: April 25, 2017 01:03 PM2017-04-25T13:03:37+5:302017-04-25T13:05:34+5:30

छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे

Sukma attack martyrdom will not be lost - Rajnath Singh | सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही - राजनाथ सिंह

सुकमा हल्ल्यातील जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही - राजनाथ सिंह

Next
ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. 25 - छत्तीसगडमधील सुकमा येथे झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या 25 जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. जवानांवर झालेला हल्ला कोल्ड ब्लडेड मर्डर असल्याचं म्हणत जवानांचं हौतात्म्य वाया जाणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. नक्षलवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध करताना राजनाथ सिंग संतप्त दिसत होते. नक्षलवाद्यांच्या समस्येला आपण एक आव्हान म्हणून स्विकारलं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
 
(नक्षलवाद्यांना भिडला सीआरपीएफचा "शेर", आई म्हणते मला गर्व)
 
जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचलेल्या राजनाथ सिंह यांनी यावेळी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री रमण सिंह यांच्याव्यतिरिक्त वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नक्षलवाद्यांनी आदिवासी लोकांना आपली ढाल बनवून हल्ला केल्याचं त्यांना यावेळी सांगितलं. " आतापर्यंत नक्षलवाद्यांवर जी कारवाई करण्यात आली आहे, त्यामुळे ते घाबरले आहे. यामुळे त्यांनी हा हल्ला केला आहे. त्यांच्याशी दोन हात करण्यासंबंधी धोरणावर पुन्हा विचार केला जाईल. 8 मे रोजी दिल्लीत यासंबंधी बैठक होईल. या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री आणि अधिकारी सामील होतील", अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली आहे. 
 
आदिवासी विभागात विकास होऊ नये यासाठी नक्षलवादी विकासात अडथळा आणण्याच्या दृष्टीने हे हल्ले करत असल्याचंही राजनाथ सिंह बोलले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी पायाभूत सुविधांशी संबंधित कामं सुरु राहतील असं सांगितलं आहेत. "विकासाशी संबंधित कामं सुरु आहेत. यामुळे नक्षलवाद्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. म्हणून रस्ते बांधकामाच्या कामात ते अडथळे आणत असून शाळा बांधून देत नाही आहेत. चांगलं धोरण आखत त्यांचा सामना केला जाईल", असं ते बोलले आहेत.
 
सुकमाच्या चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुरकापालपासून दीड किलोमीटर दूर दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी १२.१५ वाजता गस्तीवर असलेल्या पोलीस दलावर गोळीबार केला. सुरक्षा पथकानेही तत्क्षणीच पलटवार करीत गोळीबार केल्याने, दोन्ही बाजूने गोळीबाराची धुमश्चक्री उडाली. नक्षलवाद्यांनी या वर्षी केलेला हा अत्यंत भीषण हल्ला आहे.
 
सोमवारीस सकाळी या पथकाला गस्तीसाठी रवाना करण्यात आले होते. यात शंभर जवान होते. दुपारी १२ वाजता बुरकापाल नजीक हे पथक पोहोचताच दबा धरून बसलेल्या सशस्त्र नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. नक्षलवाद्यांकडे अत्याधुनिक शस्त्रे होती. सुरक्षा जवानांनीही कणखरपणे मुकाबला करीत पलटवार केला. जवळपास तीन तास भीषण चकमक सुरू होती, असे राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 

Web Title: Sukma attack martyrdom will not be lost - Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.