थकीत वेतनाच्या मागणीसाठी सहकुटंुब उपोषण
By admin | Published: August 13, 2015 11:24 PM2015-08-13T23:24:07+5:302015-08-13T23:24:07+5:30
लातूर : थकीत वेतन देणे व सेवा पुस्तिका अद्यावत करून सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याने रोशन उर्दू प्राथमिक शाळेतील सेवक शेख शकिल कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरूवार पासून उपोषण करण्यात येत आहे़
Next
ल तूर : थकीत वेतन देणे व सेवा पुस्तिका अद्यावत करून सेवा निवृत्तीचा प्रस्ताव सादर करण्यात येत नसल्याने रोशन उर्दू प्राथमिक शाळेतील सेवक शेख शकिल कुटुंबासह जिल्हा परिषदेच्या परिसरात गुरूवार पासून उपोषण करण्यात येत आहे़लातूर येथील रोशन उदूर्ु प्राथमिक शाळेतील सेवक १९९६-९८ या दोन वर्षा ची परिविक्षीविधीन कालावधीसाठी वैयक्तीक मान्यात देण्यात आली होती़ त्यानंतर १९९८-९९ पासून सेवेत सातत्य देणे आवश्यक असताना ही संच कमी झाल्याचे सांगन सेवतून कमी करण्यात आले़ या शाळेच्या प्रशासनाच्या विरुध्द शाळा न्यायाधिकरण सोलापूर येथे याचीका दाखल करण्यात आली होती़ न्यायाधिकरणाच्या निर्णयानुसार सेवक शेख शकिल यांना २००८ पासून सेवासातत्या देण्यात आले़ तसेच २००६ पासून वेतन देण्यात आले़ पण यापूर्वीचे ९९ ते २००६ पर्यंतचे वेतन अद्यापही मिळाले नसून वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नाही़ सेवानिवृत्तीसाठी ११ महिन्याचा कालावधी आहे़ पण पोट दुखीचा व अस्थामाचा आजार आणि किडणीचा आजार बळावला आहे़ नियमित उपाचारासाठी आर्थिंक गरज भासत आहे़ तसेच थकित वेतन तत्काळ देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या परिसरात सहकुटुंब उपोषण करत आहेत़