सुलेखा कुंभारेंनी स्वीकारली अल्पसंख्याक आयोगाची सूत्रे
By admin | Published: May 31, 2017 01:05 AM2017-05-31T01:05:10+5:302017-05-31T01:05:10+5:30
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष गैरुल
सुरेश भटेवरा / लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झालेल्या माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे यांनी मंगळवारी आयोगाचे अध्यक्ष गैरुल हसन रिझवी यांच्या उपस्थितीत लोकनायक भवनात पदभार स्वीकारला.
यावेळी कुंभारे म्हणाल्या की, अल्पसंख्य समाजाच्या न्याय्य हक्कांबरोबरच त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिक पुनरुत्थानासाठी मी मनापासून काम करेन. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग मुस्लिम, बौद्ध, शीख, पारशी, जैन, ख्रिश्चन आदी समाजांना विविध क्षेत्रांत न्याय मिळवून देण्याचे काम करतो. अध्यक्ष रिझवी यांच्याव्यतिरिक्त आयोगाचे चार सदस्य आहेत. कुंभारेंचे वडील १९७२ ते ७८ या काळात खासदार होते. साऊ थ अॅव्हेन्यू येथील त्यांच्या निवासस्थानी या काळात वारंवार येणे व्हायचे. अनेक वर्षांनी दिल्लीत परत येताना वडिलांच्या खासदारकीच्या काळातील आठवणी जाग्या झाल्या आहेत, असे त्या म्हणाल्या. आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल कुंभारेंनी पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.